जाणून घ्या शतकवीर लोकेश राहुलच्या ‘या’ सेलिब्रेशनचा अर्थ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी नोंद करत ३३६ धावांपर्यंत मजल मारली. लोकेश राहुलची सेंच्युरी आणि त्याला कॅप्टन विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी हाफ सेंच्युरी झळकावत दिलेली उत्तम साथ या जोरावर भारतीय बॅट्समननी सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. लोकेश राहुलची सेंच्युरी हे टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. ११४ बॉलमध्ये लोकेश राहुलने ७ फोर आणि २ सिक्स लगावत १०८ रन्स केल्या. इंग्लंडविरुद्ध टी-२० सिरीजमध्ये लोकेश राहुलची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. या पार्श्वभूमीवर राहुलला गवसलेला सूर ही टीम इंडियासाठी आश्वासक गोष्ट मानली जात आहे.

ADVERTISEMENT

२०२१ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरु होण्याचे संकेत

शतक झळकावल्यानंतर लोकेश राहुलने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कानातत बोटं घालून सेलिब्रेशन केलं. पहिली इनिंग संपल्यानंतर कॉमेंट्री करणाऱ्या मुरली कार्तिकने या सेलिब्रेशनबद्दल लोकेश राहुलला विचारलं. ज्याला उत्तर देताना लोकेश राहुल म्हणाला, “बाहेर चाललेल्या गोंधळाचा आवाज आपल्यापर्यंत येणार नाही यासाठी मी असं करतो. मला कोणाचाही अनादर करायचा नाही, पण बाहेर अशी काही लोकं असतात की जे सतत तुमच्यावर टीका करुन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तो आवाज बंद करण्यासाठी मी अशा प्रकारेन कानात बोटं घालतो.”

हे वाचलं का?

टीम इंडियाला मोठा धक्का, खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर वन-डे सिरीजमधून बाहेर

इंग्लंडविरुद्ध टी-२० सिरीजमध्ये लोकेश राहुलची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. पहिल्या ४ सामन्यांमध्ये राहुलने १,०,०,१४ अशी कामगिरी केली…ज्यानंतर पाचव्या सामन्यासाठी लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आलं नाही. टी-२० सिरीजमध्ये रन्स झाल्या नसल्यामुळे मी साहजिकच थोडासा निराश झालो होतो. पण काहीवेळासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो. आजच्या मॅचमध्ये विराट, पंतसोबत माझी पार्टनरशीप झाली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला. आज मी माझी इनिंग अधिक जबाबदारीने खेळू शकलो याचाही मला आनंद असल्याचं राहुलने सांगितलं.

ADVERTISEMENT

लोकेश राहुलव्यतिरीक्त दुसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने ६६ तर ऋषभ पंतने ७७ रन्सची इनिंग खेळली. ज्यात ऋषभने आपल्या आक्रमक खेळाने पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केलं. ४० बॉलमध्ये ३ फोर आणि ७ सिक्स लगावत ऋषभने ७७ रन्स केल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT