टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर Mahela Jayewardene ने नाकारली
विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा दिलेला राजीनामा आणि विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा संपत येत असलेला कार्यकाळ या दोन घडामोडी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. बीसीसीआयने अनिल कुंबळेला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी विचारणा केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्याआधी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी श्रीलंकेचा माजी कर्णधार-फलंदाज आणि सध्या मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन करणाऱ्या महेला जयवर्धनेला प्रशिक्षपदासाठी विचारणा केल्याचं समजतं […]
ADVERTISEMENT
विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा दिलेला राजीनामा आणि विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा संपत येत असलेला कार्यकाळ या दोन घडामोडी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. बीसीसीआयने अनिल कुंबळेला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी विचारणा केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्याआधी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी श्रीलंकेचा माजी कर्णधार-फलंदाज आणि सध्या मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन करणाऱ्या महेला जयवर्धनेला प्रशिक्षपदासाठी विचारणा केल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, अनिल कुंबळेला विचारणा करण्याआधी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी महेला जयवर्धनेला या पदाबद्दल विचारणा केली होती. परंतू जयवर्धनेने ही ऑफर नाकारली आहे. टीम इंडियाऐवजी जयवर्धनेला श्रीलंकेचा राष्ट्रीय संघ आणि मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन करण्यात अधिक स्वारस्य असल्याचं कळतंय. जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलमध्ये मुंबईने तीनवेळा विजेतेपद जिंकलं आहे.
रवि शास्त्रीनंतर प्रशिक्षकपदी पुन्हा अनिल कुंबळे?; बीसीसीआयच्या हालचाली सुरू
हे वाचलं का?
जयवर्धनेला टीम इंडियाचं प्रशिक्षकपद देण्यात सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे त्याच्याकडे असलेलं मुंबई इंडियन्सचं प्रशिक्षकपद. बीसीसीआयच्या नियमानुसार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या व्यक्तीला आयपीएलमध्ये कोणतंही लाभाचं पद भूषवता येत नाही. त्यातच जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन करण्यात स्वारस्य दाखवल्यामुळे जयवर्धनेचं नाव शर्यतीतून बाहेर पडल्याचं कळतंय.
IPL 2021 : १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या उर्वरित हंगामात संघांना या ७ नियमांचं करावं लागणार पालन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT