Wimbledon 2021 : नोवाक जोकोव्हिचचं विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद
सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचं यंदाच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपदही आपल्या खिशात टाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या बेरेट्टिनीचा ६-७, ६-४, ६-४, ६-३ असा पराभव केला. जोकोव्हिचचं हे विम्बल्डनमधलं सहावं तर ग्रँडस्लॅम स्पर्धांमधलं २० वं विजेतेपद ठरलं. या विजेतेपदासह सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद पटावण्याच्या फेडरर आणि नदालच्या विक्रमाशी […]
ADVERTISEMENT
सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचं यंदाच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपदही आपल्या खिशात टाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या बेरेट्टिनीचा ६-७, ६-४, ६-४, ६-३ असा पराभव केला.
ADVERTISEMENT
जोकोव्हिचचं हे विम्बल्डनमधलं सहावं तर ग्रँडस्लॅम स्पर्धांमधलं २० वं विजेतेपद ठरलं. या विजेतेपदासह सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद पटावण्याच्या फेडरर आणि नदालच्या विक्रमाशी जोकोव्हिचने बरोबरी केली आहे. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या अंतिम सामन्यात बेरेट्टिनीने जोकोव्हिचला चांगलंच सतावलं. दमदार आणि वेगवान सर्विसच्या जोरावर बेरेट्टिनीने पहिला सेट जिंकला.
त्यानंतर पुढच्या तीन सेटमध्ये जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत बेरेट्टिनीला मागे ढकलले. शेवटच्या सेटमध्येही बेरेट्टिनीने आपल्या वेगवान सर्व्हिसेसचा धडाका सुरूच ठेवला. काहीसे आक्रमक आणि ड्रॉप शॉटच्या जोरावर जोकोव्हिचने ही लढत आपल्या नावावर केली.
हे वाचलं का?
Won't have any grass left at this rate ?#Wimbledon | @DjokerNole pic.twitter.com/2861xBq9qZ
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या बेरेट्टिनीची ही पहिलीच विम्बल्डन फायनल मॅच होती. अशी कामगिरी करणारा तो इटलीचा पहिला खेळाडू ठरला. बेरेट्टिनीला या सामन्यात विजेतेपद मिळालं असतं तर इटलीच्या क्रीडाप्रेमींसाठी कालचा दिवस नक्कीच पर्वणी ठरला असता. १९७६ साली इटलीच्या पानाट्टा यांनी विम्बल्डनचं विजेतेपद मिळवलं होतं, परंतू बेरेट्टिनीचं हे स्वप्न जोकोव्हिचने आपल्या अनुभवाच्या जोरावर पूर्ण होऊ दिलं नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT