इंग्लंडच्या ओली रॉबिन्सनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या करिअरच्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ७ विकेट घेणाऱ्या इंग्लंडच्या ओली रॉबिन्सवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निलंबनाची कारवाई केली आहे. ७ ते ८ वर्षांपूर्वी केलेल्या वर्णद्वेषी ट्विटमुळे रॉबिन्सनवर ही कारवाई करण्यात आली आहे. ५ दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रॉबिन्सवर आता निलंबीत व्हायची वेळ आली आहे.

ADVERTISEMENT

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या शिस्तभंग चौकशीचा अहवाल येईपर्यं. रॉबिन्सनला कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळता येणार नाहीये. गुरुवारपासून एजबस्टन येथे सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्येही रॉबिन्सन खेळू शकणार नाहीये. रॉबिन्सनला इंग्लंडचा संघ तातडीने सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२०१२-१३ मध्ये रॉबिन्सनने आपल्या ट्विटमध्ये काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करुन विशिष्ठ धर्मातील लोकांचा दहशतवादाशी संबंध असल्याचं म्हटलं होतं. याचसोबत आशियाई वंशांच्या लोकांबद्दलही रॉबिन्सनने अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. रॉबिन्सननचे जुने ट्विट लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणाबद्दल रॉबिन्सनने तात्काळ माफी मागितली होती.

हे वाचलं का?

यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने रॉबिन्सनचं ट्विट तपासून कारवाई करायचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये रॉबिन्सनने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ३ विकेट घेतल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT