Rahi Sarnobat चं Olympic पदकाचं स्वप्न यंदा साकार होईल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली असली तरीही भारताच्या आशा अजुनही कायम आहेत. २५ मी, पिस्तुल प्रकारात मनू भाकेर आणि राही सरनौबत तर ५० मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात तेजस्विनी सावंत आणि अंजुम मुद्गील यांचं आव्हान अद्याप बाकी आहे. भारताच्या सर्व नेमबाजांमध्ये राही सरनौबतकडून सर्वांना पदकाच्या आशा होत्या. विशेषकरुन गेल्या काही दिवसांमधली राहीची कामगिरी पाहता सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

ADVERTISEMENT

दुर्दैवाने गुरुवारी झालेल्या पात्रता फेरीत पहिल्या राऊंडमध्ये राही सरनौबत तळातल्या स्थानावर फेकली गेली असून मनू भाकेर पदकाच्या शर्यतीत कायम आहे. शुक्रवारी राहीला आपल्या कामगिरीत सुधारणा करुन पदकाच्या शर्यतीत येण्याची संधी आहे. परंतू यासाठी तिला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. याआधीही २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये राही सरनौबत लवकर माघारी परत आली होती. २०१६ मध्ये तर राहीला ऑलिम्पिकचं तिकीटच मिळालं नाही. त्यामुळे तिसऱ्या संधीचं सोनं राही सरनौबत करणार का याकडे सर्व महाराष्ट्रासह भारताचं लक्ष असणार आहे.

Tokyo Olympic : तांत्रिक बिघाडामुळे भारताने गमावलं एक पदक, पात्रता फेरीत मनू भाकेरच्या पिस्तुलात बिघाड

हे वाचलं का?

लंडन ऑलिम्पिकदरम्यान राही सरनौबत चांगल्या फॉर्मात होती. ऑलिम्पिकआधी सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने चांगली कामगिरी केली होती. लंडन ऑलिम्पिकमध्येही राहीने सुरुवात चांगली केली, परंतू पात्रता फेरीसाठी आवश्यक गूण प्राप्त करण्यात तिला अपयश आलं. परंतू या अपयशाने खचून न जारा राहीने आपली मेहनत सुरु ठेवली. २०१३ मध्ये नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदक तर २०१४ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये राहीने सुवर्णपदकाची कमाई केली. २०१४ च्या आशियाई खेळांमध्येही राहीने सांघिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती.

Tokyo Olympic 2020 : प्रशिक्षक-खेळाडूंमधल्या वादाचा भारताला फटका? नेमबाजांकडून निराशाजनक कामगिरी

ADVERTISEMENT

मध्यंतरीच्या काळात दुखापतीमुळे राहीला रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरता आलं नाही. मध्यंतरीचा काही काळ नेमबाजीपासून दुरावल्यामुळे राहीने निवृत्तीचाही विचार केला होता. परंतू राष्ट्रीय संघटनेने तिच्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा तिला भारतीय संघात स्थान दिलं. या दुखापतीनंतर राही सरनौबतने दमदार पुनरागमन करत नेमबाजी विश्वचषकात दमदार कामगिरी करत आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे शुक्रवारी राही आपल्या कामगिरीत सुधारणा करुन पदकाला गवसणी घालते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT