ऑलिम्पिकवेड्या माणसाची गोष्ट, वयाच्या सत्तरीतही नागपूरच्या ओमप्रकाश मुंदडा यांची जगभ्रमंती सुरुच
थेट टोकियोवरुन, प्रशांत भट (मुंबई तक प्रतिनिधी) जपानच्या टोकियो शहरात सध्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. भारतीय खेळाडू इथे पदक मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. कोविडमुळे यंदा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाहीये. परंतू नागपूरचे रहिवासी असलेले ओमप्रकाश मुंदडा वयाच्या ७१ व्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोहचले आहेत. २००० साली सिडनी ऑलिम्पिकपासून सुरुवात केलेल्या […]
ADVERTISEMENT
थेट टोकियोवरुन, प्रशांत भट (मुंबई तक प्रतिनिधी)
ADVERTISEMENT
जपानच्या टोकियो शहरात सध्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. भारतीय खेळाडू इथे पदक मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. कोविडमुळे यंदा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाहीये. परंतू नागपूरचे रहिवासी असलेले ओमप्रकाश मुंदडा वयाच्या ७१ व्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोहचले आहेत.
२००० साली सिडनी ऑलिम्पिकपासून सुरुवात केलेल्या मुंदडा यांचं हे सहावं ऑलिम्पिक आहे. खेळाप्रती असलेल्या आवडीमुळे ते प्रत्येक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये व्हॉलेंटीअर म्हणून काम करतात. यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता व्हावं यासाठी मुंदडा यांनी ३ महिन्यांपासून तयारी केली होती. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी ते घराबाहेर पडले नव्हते. परंतू कोरोनामुळे यंदा आंतरराष्ट्रीय व्हॉलेंटिअरना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अखेरीस पत्रकारांच्या कोट्यातून मुंदडा टोकियो ऑलिम्पिकमध्ये दाखल झाले आहेत.
हे वाचलं का?
मुंदडा यांचं हे क्रीडाप्रेम फक्त ऑलिम्पिकपुरतं मर्यादीत राहिलेलं नाही. ऑलिम्पिकसोबतच फिफा वर्ल्डकप, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, हॉकी वर्ल्डकप अशा अनेक स्पर्धांना मुंदडा यांनी व्हॉलेंटिअर म्हणून हजेरी लावली आहे. स्पर्धा कोणतीही असो, त्यात भारतीय खेळाडू असो किंवा नसोत मी शेवटपर्यंत तिकडे थांबून भारताचं प्रतिनिधीत्व करतो असं मुंदडा मुंबई तक ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगत होते.
मुंदडा हे पेशाने व्यवसायिक आहेत, नागपूरमध्ये त्यांचा स्टिलचा धंदा आहे. कॉलेजमध्ये असताना मुंदडा यांनी हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्यासोबत एक महिना काम केलं होतं. त्यानंतर मुंदडा यांना खेळांची आवड निर्माण झाली. १९८२ सालच्या एशियन गेम्सपासून मुंदडा यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांना हजेरी लावायला सुरुवात केली. वयाची सत्तरी ओलांडली तरीही मुंदडा यांचा उत्साह हा वाखणण्याजोगा आहे. ते ज्या देशात जातात तिकडे स्वतःचं खाण्याचं सामान घेऊन जातात. या प्रवासात अनेकांची आपल्याला मदत होते. यंदा टोकियो ऑलिम्पिक पार पडल्यावनंतर पॅरालिम्पीक स्पर्धेपर्यंत ते टोकियोत थांबणार आहेत. यानंतर ते दोहा येथे एका फुटबॉल स्पर्धेसाठी व्हॉलेंटिअर म्हणून जाणार आहेत. कोरोनाच्या संकटकाळातही मुंदडा यांनी आपलं क्रीडाप्रेम कायम ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
Tokyo Olympic : मीराबाईच्या खांद्यांना बळ देणारे मराठी हात, भारताच्या रौप्यपदकामागचं बदलापूर कनेक्शन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT