Women’s World Cup:आई आणि कॅप्टन, दुहेरी जबाबदारी निभावणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूचं होतंय कौतुक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महिला विश्वचषक स्पर्धेत आज मिथाली राजच्या भारतीय संघाने पाकिस्तानवर मात करत धडाकेबाज सुरुवात केली. भारताने हा सामना जिंकला असला तरीही सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय ती पाकिस्तानी संघाची कर्णधार बिस्माह मारुफची. बिस्माह या स्पर्धेत आपल्या सहा महिन्यांच्या लहान बाळाला घेऊन सहभागी झाली आहे. आपल्या बाळाला ड्रेसिंग रुममध्ये ठेवत बिस्माहने आजचा सामना खेळला.

ADVERTISEMENT

बिस्माहचे आपल्या बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून तिचं कौतुक करण्यात येतंय. भारतीय संघाने आजच्या सामन्यात पाकिस्तानला १०७ धावांच्या फरकाने हरवत विजय मिळवला. भारताच्या स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर या जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांना अक्षरशः नाकीनऊ आणले.

Ind vs Pak women world cup : पाकिस्तानचा १०७ धावांनी उडवला धुव्वा! भारताचा विजयी प्रारंभ

हे वाचलं का?

या जोडीने केलेल्या शतकी भागिदारीमुळे भारताने पाकसमोर २४५ धावांचं आव्हान ठेवलं. पाकिस्तानी संघ हे आव्हान पूर्ण करु शकला नाही. परंतू पाकची कर्णधार बिस्माह मारुफची आज चांगलीच चर्चा झाली. लाल ड्रेसमधील बिस्माहच्या बाळाच्या फोटोवर सर्वच क्रिकेट चाहते आपली पसंती दर्शवत होते.

सामना संपल्यानंतर भारतीय महिला संघालाही या छोट्या पाहुण्यासोबत फोटोसेशन करायचा मोह आवरला नाही. भारतीय महिलांनी पाकिस्तानी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन बिस्माहच्या बाळासोबत चार निवांत क्षण घालवत फोटोसेशन केलं.

ADVERTISEMENT

भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर २४५ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची दमछाक झाली. भारताने पाकिस्तानचा अवघा संघ ४३ षटकं आणि १३७ धावांमध्येच गुंडाळला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजीत कमाल करत पाकिस्तानला धक्के दिले. त्यामुळे पाकिस्तानला शेवटपर्यंत डाव सावरता आला नाही. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर झूलन गोस्वामीने दोन गडी बाद केले.

ADVERTISEMENT

Ind vs SL : पहिला ‘डाव’ भारताचा, श्रीलंकेचा एक इनिंगने उडवला धुव्वा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT