Ranji Trophy : मुंबईची ओडीशावर डावाने मात, उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश
खडूस आर्मी असं बिरुद मिळवलेल्या मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाने यंदाच्या हंगामात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या मैदानावर मुंबईने ओडीशावर एक डाव आणि १०८ धावांनी मात करत उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. साखळी फेरीत मुंबईला सौराष्ट्राविरुद्ध सामन्यात हातात आलेला विजयाचा घास सोडून द्यावा लागला होता. परंतू यानंतर गोवा आणि ओडीशा या संघांना पराभवाची […]
ADVERTISEMENT
खडूस आर्मी असं बिरुद मिळवलेल्या मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाने यंदाच्या हंगामात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या मैदानावर मुंबईने ओडीशावर एक डाव आणि १०८ धावांनी मात करत उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. साखळी फेरीत मुंबईला सौराष्ट्राविरुद्ध सामन्यात हातात आलेला विजयाचा घास सोडून द्यावा लागला होता. परंतू यानंतर गोवा आणि ओडीशा या संघांना पराभवाची धूळ चारत मुंबईने दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT
शतकवीर सरफराज खान आणि अरमान जाफर हे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. ओडीशाने पहिल्या डावात २८४ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर मुंबईची पहिल्या डावात काहीशी अडखळती सुरुवात झाली होती.३ बाद ७३ या धावसंख्येतून अरमान जाफर आणि सरफराज खान यांनी मुंबईच्या डावाला आकार दिला. दोन्ही खेळाडूंनी शतकं झळकावत ओडीशाला बॅकफूटला ढकललं. अरमान जाफरने १२५, सरफराज खानने १६५ धावा करत आपलं योगदान दिलं. त्यांना आदित्य तारे (७२ धावा), (शम्स मुलानी ७० धावा), कर्णधार पृथ्वी शॉ (५३ धावा) यांनी चांगली साथ दिली.
उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी मुंबईला ओडीशाविरुद्ध सामन्यात निर्णयाक विजयाची गरज होती. अखेरच्या दिवशी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या गोलंदाजांनी ओडीशाची आक्षरशः दाणादाण उडवून दिली.शम्स मुलानी, सिद्धार्थ राऊत आणि तनुष कोटीयन यांच्या माऱ्यासमोर ओडीशाचा संघ कोलमडला. मधल्या फळीत ओडीशाकडून अभिषेक राऊतने अर्धशतक आणि त्याला देबाशिष सामंतरायने दिलेली साथ यामुळे मुंबईला विजयासाठी थोडी वाट पहावी लागली. परंतू हातात आलेला सामना गमावणार नाही याची काळजी मुंबईच्या गोलंदाजांनी पुरेपूर घेतली आणि उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT