‘रोहित शर्मा ‘जाडा’ आहे, पण तो…’, टीम इंडियाच्या कोचचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

rohit sharma is as fit as virat kohli says india strength and conditioning coach ankit kaliar
rohit sharma is as fit as virat kohli says india strength and conditioning coach ankit kaliar
social share
google news

Team India: भारतीय कर्णधार रोहित शर्माला त्याच्या लठ्ठपणामुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते, पण टीम इंडियाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कालियार (Ankit Kaliar) यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणतो की रोहित शर्मा (Rohit Sharma) हा विराट कोहलीइतकाच (Virat Kohli) फिट आहे. कालियार यांनी त्याची गणना जगातील अगदी योग्य क्रिकेटपटूंमध्ये केली आहे.

ADVERTISEMENT

यो-यो चाचणी सहज पास

रोहित शर्मा थोडा अंगाने जाड वाटत असला तरी जेव्हा त्याच्या फिटनेसच्या पातळीवर त्याचा विचार केला जातो त्यावेळी तो सगळ्याच पातळीवर भारी पडतो. आशिया चषक 2023 पूर्वी भारतीय संघाची यो-यो चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये रोहित शर्मानेही त्यात सहभाग घेतला होता, त्यावेळी ती चाचणी त्याने अगदी सहज पार केली होती.

हे ही वाचा >> Article 370 Verdict by Supreme Court : मोदी सरकारचा निर्णय कोर्टाने का ठरवला वैध? जाणून घ्या…

ग्राऊंडवरची चपळता जगात भारी

टीम इंडियाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कालियारने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, रोहित शर्मा हा एक एकदम फिट खेळाडू आहे. त्याचा फिटनेसही चांगला आहे. तो थोडा मोठा आणि जाड दिसतो मात्र त्याच्याकडून नेहमीच यो-यो टेस्ट पास केली जाते, त्यामुळे तो विराट कोहलीएवढाच फिट आहे. त्याच्याकडे बघून तो जाडजूड असल्याचं दिसते, मात्र त्याची चपळता आम्ही ग्राऊंडवर अनुभवली बघितली आहे. कारण ग्राऊंडवरची त्याची चपळता आणि गतिशीलता ही खरोखरच अद्भूत आहे. त्यामुळेच तो जगातील फिट क्रिकेटर पैकी तो एक आहे.

हे वाचलं का?

एकच नाव ‘विराट कोहली’

कालियारला याच मुलाखतीत दुसरा एक प्रश्न विचारला होता की, भारतीय क्रिकेट टीममध्ये कोणता खेळाडू हा शारीरिक पातळीवर अगदी फिट आहे आणि कसा फिट आहे ? त्या प्रश्नावर त्यांनी थेट एकच नाव घेतले ते म्हणजे विराट कोहली.

कोहलीचे वेळापत्रक काटेकोर

अंकित कालियार सांगतो की, ‘विराट कोहली हा भारतीय संघ आणि जगातील सर्वात चांगला खेळाडू आहे. त्यामागचे कारण आहे त्याचे काटेकोर असलेले वेळापत्रक. तो खेळत असो वा नसो, तो त्याचे पोषण, प्रॅक्टिस, सप्लिमेंट्स आणि कंडिशनिंगचे तो अगदी योग्य पालन करतो.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Kalyan Crime: तरुणासोबत लॉजवर गेलेल्या महिलेसोबत घडलं भयंकर, सापडला थेट..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT