प्लाझ्मा डोनेट करा ! वाढदिवशी सचिन तेंडुलकरचं आपल्या फॅन्सना आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस…आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने जगभरात अनेकांना आपलसं केलं. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात सचिन तेंडुलकरचे अनेक फॅन्स आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या सचिनने आजच्या दिवशी आपल्याला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत सचिनने कोरोनामधून सावरलेल्या लोकांनी प्लाझ्मा डोनेट करावा असं आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

यावेळी बोलत असताना सचिनने हॉस्पिटलमध्ये असताना आपली काळजी घेणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले. ज्या लोकांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांनी आता प्लाझ्मा डोनेट करावा. यासाठी आपण आपल्या डॉक्टरशी चर्चा करुन त्यांचा सल्ला घेऊन प्लाझ्मा डोनेट करा असं आवाहन सचिनने आपल्या फॅन्सना केलं आहे. प्लाझ्मा डोनेशनबद्दल मी देखील माझ्या डॉक्टरांशी चर्चा केली असून मी देखील लवकरच प्लाझ्मा डोनेट करणार असल्याचं सचिनने सांगितलं.

IPL 2021 Explainer : गतविजेत्या मुंबईची खराब सुरुवात, संघात हे ३ बदल करणं गरजेचं

हे वाचलं का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या सचिनचा आज ४८ वा वाढदिवस आहे. आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने वन-डे, टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. निवृत्तीनंतरही सचिनची लोकप्रियता कायम आहे. फक्त क्रिकेट नाही तर मैदानाबाहेरही सचिन नेहमी गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे येत असतो. कोरोना काळातही सचिनने मुख्यमंत्री-पंतप्रधान सहायता निधीला मदत करत अनेक गरजू व्यक्तींची जबाबदारी उचलली होती.

IPL 2021 : मुंबईला पुन्हा पराभवाचा धक्का, पंजाब किंग्जचा दणक्यात विजय

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT