Ind vs Eng : सचिन-विराटला जमलं नाही, ते गिलनं करून दाखवलं! 'हा' कारनामा करून रचला इतिहास
Shubman Gill, India vs England: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोणी केल्या भारताकडून वनडेत 50 इनिंगमध्ये सर्वाधिक 50+ धावा?
एकाच मैदानावर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणार पहिला फंलदाज
एकाच मैदानावर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये कोणत्या फलंदाजांनी ठोकले शतक?
Shubman Gill, India vs England: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलने त्याच्या वनडे करिअरमधील सातवं शतक पूर्ण केलं. गिलने 102 चेंडूत 117 धावांची शतकी खेळी केली. यामध्ये 14 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूडच्या 32 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून शुबमन गिलने सातवं शतक पूर्ण केलं. बाद होण्यापूर्वी गिलने एकूण 102 चेंडूंचा सामना केला. याचदरम्यान 109.80 च्या स्ट्राईक रेटने गिलने 112 धावा केल्या.
शुबमन गिलने केला हा खास कारनामा
तिसऱ्या वनडेत अप्रतिम फलंदाजी करून शुबमन गिलने खास कारनामे केले आहेत. गिल भारतीय संघाकडून वनडेत 50 इनिंगनंतर सर्वाधिक वेळा 50+ धावांची खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. गिलने वनडेच्या 50 इनिंगमध्ये 22 वेळा 50+ चा स्कोर केला केला.
भारताकडून वनडेत 50 इनिंगमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे फलंदाज
22 - शुबमन गिल
20 - श्रेयस अय्यर
19 - नवज्योत सिंग सिद्धू
18 - विराट कोहली
18 - के एल राहुल
हे ही वाचा >> Krishnaraaj Mahadik: रिंकू राजगुरुचं महाडिकांच्या 'परशा'शी होणार लग्न? खुद्द कृष्णराज महाडिकांनी सांगितली Inside Story
एकाच मैदानावर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणार बनला पहिला फंलदाज
शुबमन गिलने भारतीय क्रिकेट संघाकडून एकाच मैदानावर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. वनडेच्या आधी पहिल्या टी-20 आणि टेस्टमध्ये गिलने अहमदाबादमध्ये शतक ठोकलं होतं. गिल फक्त भारताकडूनच नव्हे, तर वर्ल्ड क्रिकेटमध्ये एकाच मैदानात तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी हा खास कारनामा बाबर आझम, फाफ डु प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डी कॉकने केला होता.










