उमरान मलिकची हवा, 20 वी ओव्हर मेडन टाकत दिग्गज बॉलर्सशी बरोबरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

आयपीएल 2022 मध्ये खराब सुरुवातीनंतर हैदराबादच्या संघाने आता वेग धरला आहे.

हे वाचलं का?

नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीअमवर झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाब किंग्ज संघावर 7 विकेट्सने मात केली.

ADVERTISEMENT

आजच्या सामन्यात हैदराबादकडून हिरो ठरला तो म्हणजे जम्मू-काश्मीरचा युवा खेळाडू उमरान मलिक.

ADVERTISEMENT

उमरान मलिकने भेदक मारा करत 4 ओव्हरमध्ये 28 रन देत 4 विकेट घेतल्या. आजच्या सामन्यात उमरानने आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली.

उमरानने सामन्यातली अखेरची ओव्हर म्हणजेच 20 वी ओव्हर मेडन टाकली. सर्वसाधारणपणे या ओव्हरमध्ये फलंदाज धावा जमवण्याचा प्रयत्न करतात.

परंतू उमरान मलिकने अखेरच्या ओव्हरमध्ये ओडेन स्मिथ, राहुल चहर आणि वैभव अरोरा यांना आऊट करत एकही रन न देता पंजाबला 151 धावांवर रोखलं.

या धडाकेबाज कामगिरीहसह उमरान मलिकने दिग्गज गोलंदाजांशी बरोबरी केली आहे. आयपीएलच्या इतिहासात 20 वी ओव्हर मेडन टाकणारा उमरान चौथा बॉलर ठरला आहे.

इरफान पठाण – आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात पंजाबकडून खेळत असताना इरफान पठाणे मेडन ओव्हर टाकली होती. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळत असताना इरफान पठाणने हा करिष्मा करुन दाखवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

लसिथ मलिंगा – मुंबई इंडियन्सचा सर्वात अनुभवी बॉलर आणि सध्या राजस्थानचा प्रशिक्षक असलेल्या मलिगांने 2009 साली डेक्कन चार्जर्सविरुद्ध सामन्यात अशीच कामगिरी केली होती.

जयदेव उनाडकट – 2017 साली पुणे सुपरजाएंट संघाकडून खेळत असताना उनाडकटने हैदराबादविरुद्ध हॅटट्रीक घेत मेडन ओव्हर टाकली होती.

आता या यादीत उमरान मलिकचं नाव जोडलं जाणार आहे. आपल्या वेगाने उमरान मलिकने सर्वांना प्रभावित केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT