Ind vs SL : अखेरच्या टी-२० सामन्यात भारताची दाणादाण, श्रीलंकेने मालिका जिंकली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा भारतीय संघाला टी-२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारताने टी-२० मालिकेत चांगली सुरुवात केली होती. पहिला टी-२० सामना जिंकत भारताने मालिकेत आघाडीही घेतली. परंतू यानंतर भारतीय गोटात कोरोनाने केलेल्या शिरकावामुळे संघाचा सर्व ताळमेळ फसला.

ADVERTISEMENT

दुसरा टी-२० सामना ४ विकेटने जिंकत श्रीलंकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर अखेरच्या सामन्यात भारताची दाणादाण उडवत श्रीलंकेने ७ विकेट राखून ८२ धावांचं आव्हान पूर्ण करत मालिका २-१ ने खिशात घातली.

टॉस जिंकत भारताने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. नवोदीत खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवातच खराब झाली. कॅप्टन शिखर धवन एकही रन न काढता चमीराच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर देवदत पडीक्कल आणि संजू सॅमसनही झटपट माघारी परतल्यामुळे भारताची अवस्था आणखी बिकट झाली. मैदानावर स्थिरावू पाहणारा ऋतुराज गायकवाडही लगेच माघारी परतल्यामुळे भारत एका क्षणाला ४ बाद २५ अशा खडतर परिस्थितीत सापडला.

हे वाचलं का?

दुर्दैवाने यानंतर भारतीय संघ सामन्यात कमबॅक करुच शकला नाही. आयपीएल गाजवणाऱ्या नितीश राणानेही निराशा केली. भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी छोटेखानी भागीदारी करत भारताला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अखेरीस निर्धारित ओव्हर्समध्ये श्रीलंकेने भारताला ८१ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. लंकेकडून हसरंगाने ४, शनकाने २ तर मेंडीस आणि चमीराने १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेची सुरुवातही यथातथाच झाली. राहुल चहरने अविष्का फर्नांडोला आपल्याच बॉलिंवर सुरेख कॅच घेत आऊट केलं. ठराविक अंतराने मिनोद भनूकाही चहरच्या बॉलिंगवर आऊट झाला. परंतू विजयासाठी अत्यांत कमी रन्सचं आव्हान असल्यामुळे लंकेच्या बॅट्समननी भारताला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. समरविक्रमा चहरच्या बॉलिंगवर आऊट झाल्यानंतर धनंजय डी-सिल्वाने फटकेबाजी करत भारताच्या आव्हानातली हवाच काढून घेतली.

ADVERTISEMENT

Ind vs SL : खेळाडू इथे सहलीला आलेले नाहीत ! गावसकरांच्या टीकेला Rahul Dravid चं प्रत्युत्तर

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT