SL vs Ind 2021 : भारताच्या दौऱ्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला होणार मोठा आर्थिक फायदा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रीलंका आणि भारत यांच्यातील ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला लवकरच सुरुवात होते. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरेल. विराट कोहली आणि इतर मुख्य खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर बीसीसीआयने तरुणांना संधी दिली आहे. मध्यंतरी या निर्णयावर श्रीलंकेचा माजी कॅप्टन अर्जुन रणतुंगाने टीकाही केली होती. परंतू भारताच्या दौऱ्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला मोठा फायदा होणार आहे.

ADVERTISEMENT

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने अध्यक्ष शमी सिल्वा यांनी याबद्दल माहिती दिली. सुरुवातीला भारतीय संघ या दौऱ्यावर फक्त ३ सामने खेळणार होता. परंतू श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या विनंतीवरुन बीसीसीआयने या दौऱ्यात वाढ करुन आणखी ३ सामन्यांचं आयोजन केलं. या आयोजनामुळे श्रीलंकन बोर्डाला १२ लाख अमेरिकन डॉलर्सचा फायदा होणार आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ८९ कोटी)

सुरुवातीला हा दौरा तीन सामन्यांचा होता, परंतू यानंतर आम्ही बीसीसीआयशी चर्चा करुन ३ सामने आणखी खेळायचं ठरवलं. या जास्तीच्या सामन्यांमुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला ६ लाख अमेरिकन डॉलर्सचं उत्पन्न मिळणार आहे. बोर्डाच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्वाचा असल्याची माहिती अध्यक्ष शमी सिल्वा यांनी dailynews शी बोलताना दिली.

हे वाचलं का?

मध्यंतरी श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट वरुन वाद सुरु होता. परंतू खेळाडूंच्या पगारात कोणतीही कपात करण्यात आलेली नसल्याचं अध्यक्ष सिल्वा यांनी स्पष्ट केलं. याचसोबत खेळाडूंच्या सोयी-सुविधांमध्येही कोणतीही कपात होणार नसल्याचं सिल्वा यांनी स्पष्ट केलं. १३ जुलैपासून भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT