T-20 वर्ल्डकपचं आयोजन युएईत? BCCI स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे प्रयत्न थांबवणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचं आयोजन हे युएईत केलं जाण्याची शक्यता आहे. भारतातली कोरोनाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयसीसीला युएईत आयोजनासंदर्भातली तयारी करण्यासाठी कळवलं असल्याचे माहिती मिळते आहे. शारजाह, दुबई आणि अबुधाबी याव्यतिरीक्त ओमानमध्येही काही सामन्यांचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Champions Trophy is Back ! ICC कडून टी-२० आणि वन-डे वर्ल्डकप चा विस्तार

आयसीसीने भारतात कोणत्याही कारणामुळे स्पर्धेचं आयोजन करता आलं नाही तर युएई हा अधिकृत पर्याय याआधीच जाहीर करुन ठेवला होता. यामध्ये आता ओमानची राजधानी मस्कत येथेही काही सामने खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. “१ जून रोजी झालेल्या बैठकीत बीसीसीआयने आयोजनासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी मागितला होता. पण त्यानंतर झालेल्या चर्चेत बीसीसीआय आयोजनाचे हक्क आपल्याकडे ठेवून स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये भरवण्यासाठी तयार आहे.” ICC मधील अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली.

हे वाचलं का?

IPL 2021 साठी टीम ओनर्सची तयारी सुरु, UAE मध्ये हॉटेल बुकींगला सुरुवात

ओमानचा समावेश हा साखळी फेरीतल्या सामन्यांसाठी करण्यात आला असून आयपीएलचा उर्वरित हंगाम आटोपला की युएईमधील तिन्ही मैदानांना टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी वेळ मिळावा यासाठी ओमानमध्ये साखळी फेरीतले सुरुवातीचे सामने खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे. कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा मध्यावधित स्थगित करावी लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईत हलवला आहे.

ADVERTISEMENT

जर आयपीएल स्पर्धा १० ऑक्टोबरपर्यंत संपली तर टी-२० वर्ल्डकपच्या दर्जाला साजेशा खेळपट्ट्या तयार करण्यासाठी आमच्याकडे ३ आठवड्यांचा कालावधी उरतो. तोपर्यंतचे सामने हे ओमानमध्ये खेळवले जाऊ शकतात असं आयसीसीच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं. त्यामुळे याबद्दल बीसीसीआय आणि आयसीसी अंतिम निर्णय कधी घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT