T20 WC, Ind Vs Pak: टीम इंडियाचे फक्त ‘हे’ 5 खेळाडूच पाजू शकतात पाकिस्तानला पाणी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

T20 WC, Ind Vs Pak: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. T-20 विश्वचषकाच्या सुपर-12 राऊंडमध्ये आज दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. बऱ्याच वर्षांनी या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक वर्ल्डकपमध्ये भारताचा रेकॉर्ड हा खूपच चांगला झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील भारतच विजयी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ADVERTISEMENT

अशा स्थितीत जर भारतीय संघातील फक्त पाच खेळाडू जरी फॉर्मात आले तर हा सामना जिंकणं पाकिस्तानला शक्य होणार नाी. टीम इंडियाचे असे कोणते पाच खेळाडू आहेत की जे आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर पाकिस्तानला पाणी पाजू शकतात?

1. केएल राहुल: केएल राहुल हा भारतीय संघातील सर्वोत्तम टी-20 फलंदाजांपैकी एक आहे. अलीकडेच आयपीएलमध्ये राहुलने बऱ्याच धावा केल्या आहेत. केएल राहुलने सराव सामन्यांमध्येही चांगली फलंदाजी केली आहे. अशा स्थितीत राहुलने सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या गोलंदाजांवर प्रेशर टाकलं, तर पाकिस्तानला सामन्यावर वर्चस्व मिळवता येणार नाही. दरम्यान, केएल राहुलच्या नावावर टी-20 मध्येही शतक आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण इनिंग खेळण्याची त्याच्याकडे क्षमता देखील आहे.

हे वाचलं का?

एकूण टी-20: 49, धावा 1557, सरासरी 39.92, शतके 2

2. रोहित शर्मा: अलीकडच्या काळात रोहित शर्मा टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उदयास आला आहे. विशेषतः विश्वचषकात रोहित शर्मान खूप धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा सामना पाकिस्तानशी असतो, तेव्हा रोहित शर्मावरील जबाबदारी देखील वाढते. वनडे विश्वचषकातही रोहितने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले आहे. रोहित सध्या फारसा फॉर्मात नव्हता. पण सराव सामन्यात तो पुन्हा एकदा लयीत दिसून आला.

ADVERTISEMENT

एकूण टी-20: 111, धावा 2864, सरासरी 32.54, शतके 4

ADVERTISEMENT

3. विराट कोहली: कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हा त्याच्यासह टीमसाठी चिंतेची बाब आहे. पण मोठ्या सामन्यांमध्ये त्याची बॅट तळपल्याचं आपणं अनेकदा पाहिलं आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अनेकदा आपला फॉर्म दाखवून दिला आहे. 2016 च्या टी-20 विश्वचषकातही विराटने आश्चर्यकारक कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आला तर तो संघाला वेगाने धावा करण्यास मदत करू शकतो. यासोबतच विराटची भूमिका कर्णधार म्हणून देखील खूप महत्त्वाची असेल.

एकूण टी-20: 90, धावा 3159, सरासरी 52.65, शतके 0

4. जसप्रीत बुमराह: जसप्रीत बुमराह गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आला आहे. अशा स्थितीत या मोठ्या सामन्यातून त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सुरुवातीला धक्के द्यायचे असो की शेवटच्या षटकांमध्ये धावांचा वेग नियंत्रित ठेवायचा असो. जसप्रीत बुमराहच्या यॉर्करला तोड नाही. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहने या सामन्यात पूर्ण फॉर्ममध्ये राहून पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडल्यास हा सामना जिंकणं खूपच सोप्पं होईल.

एकूण T-20: 50, विकेट्स 59, सरासरी 20.25, सर्वोत्तम 3/11

5. वरुण चक्रवर्ती: वरुण चक्रवर्तीला पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाली तर तो ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो. वरुण चक्रवर्ती हा आयपीएलमधील एक मिस्ट्री स्पिनर मानला जातो. त्याला सतत खेळणारे फलंदाजही त्याचा चेंडू ओळखू शकत नाहीत. अशा स्थितीत पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियासाठी हे फायदेशीर ठरू शकते. पाकिस्तानचे फलंदाज भले चांगले असतील, पण वरुणचा चेंडू ओळखणं हे त्यांच्यासाठी सोपे नसेल. त्यामुळे संधी मिळाल्यास वरुण चक्रवर्ती आपली चार षटके कशी टाकतो, हे पाहणे मनोरंजक असेल.

T20 World Cup : दुबईत आज दोन शेजारी आपापसात भिडणार, जाणून घ्या विजयाची आकडेवारी काय सांगते?

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा संघ उतरणार मैदानात

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ, हैदर अली

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT