Rohit Sharma सोबतच्या कथित वादावर Virat म्हणतो, ‘मी आता सांगून-सांगून थकलोय’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघात झालेला नेतृत्वबदल आणि रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहलीमधल्या कथित वादामुळे प्रकरण चांगलंच तापलं होतं. त्यातच रोहित शर्माने कसोटी संघाचं उप-कर्णधारपद मिळाल्यानंतर दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर रोहित आणि विराटमध्ये वाद झाल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उत आला.

ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी विराट कोहलीने याबद्दल आपलं मत स्पष्टपणे सांगितलं आहे.

“माझ्यात आणि रोहितमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाहीये. गेल्या अडीच वर्षापासून मी ही गोष्ट वारंवार सांगत आलोय, आता मी खरंच थकलोय. राहुल सर आणि रोहितच्या मदतीने भारतीय संघाला योग्य दिशेने नेणं हे माझं काम आहे. यापुढच्या प्रवासात दोघांनाही माझा पूर्ण पाठींबा असणार आहे.”

हे वाचलं का?

Virat Kohli: ‘सिलेक्टर्सने अगदी कॉल कट करताना सांगितलं.. आता तू वनडेचा कॅप्टन नाही’, विराटने सांगितला ‘तो’ किस्सा

यापुढे रोहितच्या कर्णधारपदाबद्दल बोलत असताना विराटने त्याचं कौतुक केलं. रोहित शर्मा हा एक सक्षम कर्णधार आहे, त्याला क्रिकेटमधल्या रणनितींचं चांगलं ज्ञान आहे. भारतीय संघासाठी आणि आयपीएममध्ये आपण त्याची कामगिरी पाहिली आहे. यापुढेही राहुल सरांच्या सोबतीने माझा रोहितला पूर्ण पाठींबा असेल असं म्हणत विराटने आपल्यात आणि रोहितमध्ये वाद असल्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

ADVERTISEMENT

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवड करताना निवड समितीने भारताच्या वन-डे संघाची कमानही रोहितच्या हातात दिली. या निर्णयामागचं लॉजिक आपल्याला माहिती असल्याचंही विराट म्हणाला. ही गोष्ट खरी आहे की आम्ही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, त्यामुळे हा निर्णय का घेण्यात आला याची मला कल्पना असल्याचंही विराटने सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT