Tokyo Olympic 2020 : Mary Kom चं आव्हान संपुष्टात, कोलंबियाच्या बॉक्सरने केली मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताची सर्वात अनुभवी बॉक्सर आणि सुपरमॉम मेरी कोमचं दुसरं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं स्वप्न संपुष्टात आलंय. लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदकाची कमाई केलेल्या मेरी कोमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये Round of 16 मध्ये कोलंबियाच्या इन्ग्रिट वेलेन्सियाकडून पराभव पत्करावा लागला.

ADVERTISEMENT

याआधीच्या सामन्यात मेरी कोमने Dominican Republic च्या मिग्युलिना ग्रेसियाचा ४-१ ने पराभव केला होता. पहिल्या सामन्यात ३८ वर्षीय मेरी कोमने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामन्यात बाजी मारली होती. सहावेळा World Championship स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या मेरी कोमकडून भारताला पदकाची आशा होती.

परंतू कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात चित्र वेगळं पहायला मिळालं. कोलंबियाच्या बॉक्सरने मेरी कोमला थकवून तिला चूक करायला भाग पाडलं. पहिला सेट जिंकल्यानंतर मेरी कोमने दमदार पुनरागमन करत दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारली. परंतू दुसऱ्या सेटमध्येही निर्विवाद वर्चस्व गाजवण्यात तिला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये वेलेन्सियाने आक्रमक पवित्रा आजमावत मेरी कोमला बॅकफूटला ढकलत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. सरतेशेवटी पाचपैकी ३ पंचांनी वेलेन्सियाच्या पारड्यात मत टाकत तिला विजेता घोषित केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT