Tokyo Olympic 2020 : अतानू दासचा मोठा विजय ! अटीतटीच्या लढतीत दिग्गज कोरिअन खेळाडूवर मात
टोकियो ऑलिम्पमध्ये भारतीय संघाचा तिरंदाज अतानू दासने मोठ्या विजयाची नोंद केली आहे. कोरियाच्या दोनवेळा सुवर्णपदक विजेत्या ओह जिनयेकचा अतानू दासने अटीतटीच्या लढतीत ६-५ असा पराभव केला. या विजयासह अतानू दासने Round of 16 मध्ये प्रवेश केला आहे. अतानू दासचा पुढचा सामना जपानच्या फुरुकावा ताकाहारुविरुद्ध ३१ जुलैला रंगणार आहे. चीन तैपेईच्या खेळाडूवर ६-४ ने मात करत […]
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पमध्ये भारतीय संघाचा तिरंदाज अतानू दासने मोठ्या विजयाची नोंद केली आहे. कोरियाच्या दोनवेळा सुवर्णपदक विजेत्या ओह जिनयेकचा अतानू दासने अटीतटीच्या लढतीत ६-५ असा पराभव केला. या विजयासह अतानू दासने Round of 16 मध्ये प्रवेश केला आहे. अतानू दासचा पुढचा सामना जपानच्या फुरुकावा ताकाहारुविरुद्ध ३१ जुलैला रंगणार आहे.
ADVERTISEMENT
चीन तैपेईच्या खेळाडूवर ६-४ ने मात करत अतानूने पुढच्या फेरीत प्रवेश केला. कोरियन खेळाडूशी सामना असल्यामुळे अनेकांनी अतानू दासचा त्याच्यासमोर निभाव लागणार नाही असाच अंदाज वर्तवला होता. अतानू दासवर मात करत कोरियाच्या ओह जिनयेकने चांगली सुरुवात केली. परंतू कोरियाच्या खेळाडूला हा विजय सहजासहजी मिळवता आला नाही. केवळ एका गुणाच्या फरकाने कोरियाने हा सेट जिंकला.
Tokyo Olympic Explainer : तिरंदाजीत दक्षिण कोरिया कसं गाजवतं एकहाती सत्ता? काय आहे त्यांच्या यशामागचं रहस्य?
हे वाचलं का?
यानंतर पुढच्या दोन सेटमध्ये अतानू दासने पिछाडी भरुन काढत दमदार कमबॅक करत सेट बरोबरीत सोडवला. यानंतर टायब्रेकरमध्ये महत्वाचा पॉईंट जिंकत अतानूने सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये कोरियाच्या खेळाडूचं लक्ष्य विचलीत झालं आणि त्याने अनुक्रमे ९, ७, ६ अशा गुणांची कमाई केली. इथे मोक्याच्या क्षणी अतानू दासने बाजी मारत सेट जिंकत सामना बरोबरीत आणला.
Tokyo Olympic 2020 : दिपीका कुमारीच्या रुपाने तिरंदाजीत भारताचं आव्हान कायम
ADVERTISEMENT
अखेरचा सेट सुरु होण्याआधी सामना ४-४ अशा बरोबरीत होता. परंतू अतानूने संयमी खेळ दाखवत पुन्हा एकदा कोरियाच्या खेळाडूशी बरोबरी केली. अखेरचा सेटही बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरमध्ये कोरियाच्या खेळाडूने ९ गुणांची कमाई केली. अतानू दासने मोक्याच्या क्षणी १० गुण मिळवत सामन्यात बाजी मारली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT