Tokyo Olympic 2020 : प्रशिक्षक-खेळाडूंमधल्या वादाचा भारताला फटका? नेमबाजांकडून निराशाजनक कामगिरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी पदकांची कमाई करणाऱ्या भारताला अजुनही आपल्या दुसऱ्या पदकाची प्रतीक्षा कायम आहे. मध्यंतरीच्या दिवसांत भारताने तिरंदाजी, नेमबाजी अशा अनेक महत्वाच्या स्पर्धेत निराशाजनक खेळ करुन हातातलं पदक गमावलं. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्येही भारतीय नेमबाजांनी अशीच निराशाजनक कामगिरी केली होती.

ADVERTISEMENT

भारतीय नेमबाजांच्या या निराशाजनक कामगिरीनंतर आता आरोप-प्रत्यारोप आणि संघटनात्मक राजकारणाला सुरुवात झाली आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख रणिंदर सिंग यांनी भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीला Administrative Failure चं नाव दिलं आहे.

Tokyo Olympic : तांत्रिक बिघाडामुळे भारताने गमावलं एक पदक, पात्रता फेरीत मनू भाकेरच्या पिस्तुलात बिघाड

हे वाचलं का?

सध्याच्या घडीला २५ मी. पिस्तुल प्रकारात मनू भाकेर आणि राही सरनौबत तर ५० मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात तेजस्विनी सावंत आणि अंजुम मुद्गील यांच्या रुपाने भारतीय तिरंदाजांचं आव्हान या स्पर्धेत बाकी राहिलेलं आहे. परंतू पिस्तुल प्रकारात अभिषेक वर्मा, मनू भाकेर, सौरभ चौधरी यांच्याकडून पदकाची आशा असतानाही भारताला रिकाम्या हाताने परतावं लागलं. प्रशिक्षक जसपाल राणा आणि मनू यांच्यात मतभेद होते आणि जसपाल राणा खेळाडूंमध्ये नकारात्मकता पसरवत असल्याचा आरोप रणिंदर सिंग यांनी केला आहे.

परंतू हे प्रकरण ऑलिम्पिक पूरतं मर्यादीत राहत नाही. २०१८ साली युथ ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर युवा नेमबाज सौरभ चौधरीने NRAI ला ई-मेल करुन मला जसपाल राणा यांच्याकडून कोचिंग घेण्यात रस नाही असं कळवलं होतं. परंतू NRAI ने सौरभ चौधरीला जर तुला ज्युनिअर कॅटेगरीमध्ये खेळायचं असेल तर जसपाल राणा यांच्याकडून शिकावं लागेल असं कळवलं. यानंतर सौरभ चौधरीने सिनीअर गटातून खेळण्याचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

यानंतर २०१८ च्या अखेरीस २५ मी. पिस्तुल प्रकारातला नेमबाज अनीश भानवालानेही NRAI ला जसपास राणा यांच्यासोबत काम करता येणार नाही असं कळवलं होतं. परंतू NRAI ने त्यावेळीही आपली भूमिका कायम ठेवली. २०२१ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या एका स्पर्धेत मनू भाकेरला जसपाल राणा यांच्या एका नेमबाजाकडून पराभव स्विकाराला लागला होता. NRAI ने यावेळीही जसपाल राणा यांच्यावर काहीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिकआधी ट्रेनिंग कँपमध्येही जसपाल राणा, रौनक पंडीत आणि समशेर जंग या तीन प्रशिक्षकांनी कँपला जाण्यास नकार दिला, जंग आणि पंडीत यानंतर ट्रेनिंग कँपला जाऊन कोचिंग द्यायला सुरुवात केली. अभिषेक वर्मानेही यानंतर जसपाल राणा यांची मदत न घेता एकट्याने सराव करायचं ठरवलं. त्यामुळे खेळाडूंनी राष्ट्रीय कोचकडून प्रशिक्षण घ्यायचं की फॉरेन कोचकडून दे द्वंद्व सोडवण्यात NRAI कमी पडली.

टोकियातल्या निराशाजनक कामगिरीनंतर खेळाडूंसोबत प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या कामाचीही चौकशी केली जाणार असल्याचं रणिंदर सिंग यांनी स्पष्ट केलंय. परंतू खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातला वाद मिटवण्यात संघटनेला आलेल्या अपयशामुळे भारतीय नेमबाज ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरले की काय अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT