Tokyo Olympic 2020 : Sindhu च्या विजयात मोलाची भूमिका बजावणारे Park Tae-Sang आहेत तरी कोण? जाणून घ्या…
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली. उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला, यानंतर तिने कांस्यपदकासाठीच्या लढाईत चिनी खेळाडूवर मात केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूला मार्गदर्शन करण्यात एका व्यक्तीने मोलाची भूमिका बजावली. साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यापासून हा व्यक्ती तिच्या पाठीशी असून प्रत्येक मोक्याच्या क्षणी तिला मार्गदर्शन करत होता. हा व्यक्ती […]
ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली. उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला, यानंतर तिने कांस्यपदकासाठीच्या लढाईत चिनी खेळाडूवर मात केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूला मार्गदर्शन करण्यात एका व्यक्तीने मोलाची भूमिका बजावली.
साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यापासून हा व्यक्ती तिच्या पाठीशी असून प्रत्येक मोक्याच्या क्षणी तिला मार्गदर्शन करत होता. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीनसून सिंधूचे परदेशी कोच पार्क ताए सांग आहेत. सिंधूने कांस्यपदकाचा सामना जिंकल्यानंतर सांग यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जात होता. सिंधूला मार्गदर्शन करणाऱ्या सांग यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Tokyo Olympic 2020 : बॅडमिंटनमध्ये P.V.Sindhu ला कांस्यपदक, चिनी खेळाडूवर मात
सिंधू प्रामुख्याने दोन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या हैदराबाद येथील अकादमीत सिंधूचा सराव सुरु असतो. याच जोरावर तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. २०१९ मध्ये सिंधूने दक्षिण कोरियाच्या किम जी-ह्यून यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरु केला. परंतू काही महिन्यांमध्येच ह्यून यांना आपलं काम सोडावं लागलं. यानंतर त्यांची जागा पार्क ताए-सांग यांनी घेतली.









