Tokyo Olympic 2020 : तिरंदाजीत भारताचं आव्हान संपुष्टात, दिपीका-प्रवीण जाधव जोडी पराभूत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी संमिश्र सुरुवात केली आहे. तिरंदाजी मिश्र प्रकारात भारताच्या दिपीका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीने पिछाडी भरुन काढत चीन तैपेईचा ५-३ च्या फरकाने पराभव केला. परंतू यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीचं आव्हान संपुष्टात आलंय.

ADVERTISEMENT

दक्षिण कोरियाच्या जोडीने भारतीय जोडीवर ६-२ ने मात करत आगेकूच केली आहे. चीन तैपेईचा पराभव करणाऱ्या भारतीय जोडीचा कोरियन जोडीसमोर निभाव लागू शकला नाही. विशेषकरुन मोक्याच्या क्षणी प्रवीण जाधवने केलेली निराशाजनक कामगिरी भारताला चांगलीच भोवली.

ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी प्रकारात मिश्र स्पर्धा खेळवण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि पहिल्याच प्रयत्नात भारतीय जोडीने अत्यंत आश्वासक खेळ करत भारताच्या पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी धडाकेबाज खेळ केला. चीन तैपेईने सुरुवातीच्या सत्रात आघाडी घेतलेली असतानाही प्रवीण जाधवने नंतरच्या सत्रात चांगल्या गुणांची कमाई केली.

हे वाचलं का?

यानंतर दिपीका कुमारीने आपल्या अनुभवाच्या जोरावर आघाडी मिळवत अखेरपर्यंत ही आघाडी कायम राहिल याची काळजी घेतली. पुरुष आणि महिला खेळाडूंमध्ये सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूला मिश्र प्रकारात संधी मिळते. भारतीय संघाची रचना पाहता दिपीका कुमारी आपला पती आणि सहकारी खेळाडू अतानू दाससोबत मैदानात उतरेल असं वाटलं होतं. परंतू प्रवीण जाधवने अतानू दासच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्यामुळे भारताने दिपीका कुमारी आणि प्रवीण जाधव जोडीला मैदानात उतरवलं. परंतू कोरियाविरुद्ध पराभवानंतर आता मिश्र प्रकारात भारताचं आव्हान अखेर संपुष्टात आलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT