परंपरा कायम, मुंबईची पहिली मॅच देवाला ! हातात आलेला सामना गमावल्याबद्दल रोहित म्हणतो…
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबईवर ४ विकेट्सने मात करत गेलेला सामना खेचून आणला. एका क्षणापर्यंत मुंबईचा संघ या सामन्यात जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. परंतू अखेरच्या ओव्हर्समध्ये झालेला खराब मारा, टीम डेव्हीडने सोडलेला एक कॅच आणि ढिसाळ फिल्डींगमुळे दिल्लीने सामन्यात कमबॅक केलं. या पराभवासह मुंबई इंडियन्सची पहिली […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबईवर ४ विकेट्सने मात करत गेलेला सामना खेचून आणला. एका क्षणापर्यंत मुंबईचा संघ या सामन्यात जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. परंतू अखेरच्या ओव्हर्समध्ये झालेला खराब मारा, टीम डेव्हीडने सोडलेला एक कॅच आणि ढिसाळ फिल्डींगमुळे दिल्लीने सामन्यात कमबॅक केलं.
ADVERTISEMENT
या पराभवासह मुंबई इंडियन्सची पहिली मॅच देवाला सोडण्याची परंपराही कायम राहिली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबईचा संघ सर्वात यशस्वी मानला जातो. मुंबईकडे आयपीएलची पाच विजेतेपदं आहेत.
IPL 2022 : मुंबईकर हिटमॅनची अव्वल स्थानाकडे वाटचाल, जाणून घ्या रोहितने केलेल्या विक्रमाविषयी
हे वाचलं का?
परंतू आतापर्यंतच्या इतिहासात मुंबईचा संघ १५ पैकी ३ वेळा सलामीचा सामना जिंकू शकलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे २०१३ पासून मुंबई इंडियन्स एकदाही सलामीचा सामना जिंकू शकलेलं नाहीये. त्यांची हीच परंपरा यंदाच्या हंगामातही कायम राहिली आहे.
Today – #MIvsDC
MI In 1st Match of IPL
2022 – ???
2021 – Lost
2020 – Lost
2019 – Lost
2018 – Lost
2017 – Lost
2016 – Lost
2015 – Lost
2014 – Lost
2013 – Lost
2012 – Won
2011 – Won
2010 – Won
2009 – Won
2008 – Lost— CricBeat (@Cric_beat) March 27, 2022
दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतलेला असताना शार्दुल ठाकूर, ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी फटकेबाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. हा सामना गमावल्यानंतर रोहित शर्माने आपली प्रतिक्रीया दिली.
ADVERTISEMENT
Rohit: “Honestly, that's never been the talk (of winning the first game). We always come prepared, whether it's the first game or last game, we want to try and win every game.”#OneFamily #MumbaiIndians #दिलखोलके #DCvMI #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
Rohit: “We made some mistakes on the field which didn't go according to plans. But those things can happen. We just need to keep it tight within the group.”#OneFamily #MumbaiIndians #दिलखोलके #DCvMI #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
“मला असं वाटलं आम्ही उभा केलेला स्कोअर पुरेसा ठरेल. या पिचवर १७० च्या पुढे स्कोअर होईल असं मलाही वाटलं नव्हतं. आम्ही चांगला खेळ केला, २०१३ पासून आम्ही पहिला सामना जिंकला नाही या गोष्टींबद्दल आम्ही कधीच चर्चा करत नाही. प्रत्येक सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
ADVERTISEMENT
IPL 2022 : मुंबईने विजयाची संधी गमावली, दिल्ली कॅपिटल्स ४ विकेट्सने विजयी
आम्ही फिल्डींगदरम्यान काही चूका केल्या, ज्यामुळे आमची सगळी रणनिती बिघडली. पण या गोष्टी होत असतात, आम्हाला फिल्डींगवर थोडं अजून लक्ष देण्याची गरज असल्याचं रोहितने स्पष्ट केलं.
IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला झुकतं माप? रोहित इतर संघांना आपल्या खास शैलीत दिलं उत्तर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT