आयेशाच्या प्रेमात वेडा झाला होता Shikhar, चॅटींगच्या नादात फ्लाईटही सुटलं होतं
टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा यांचा घटस्फोट झाला आहे. आयेशाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली. आयेशा आणि शिखरच्या तब्बल ९ वर्षांच्या सुखी संसाराचा अखेरीस शेवट झाला आहे. शिखर धवनकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रीया आलेली नसली तरीही या दोघांच्या प्रेमाचे किस्से हे खूप गाजले होते. शिखर धवन मुळचा दिल्लीचा […]
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा यांचा घटस्फोट झाला आहे. आयेशाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली. आयेशा आणि शिखरच्या तब्बल ९ वर्षांच्या सुखी संसाराचा अखेरीस शेवट झाला आहे. शिखर धवनकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रीया आलेली नसली तरीही या दोघांच्या प्रेमाचे किस्से हे खूप गाजले होते.
ADVERTISEMENT
शिखर धवन मुळचा दिल्लीचा तर आयेशाचा जन्म हा पश्चिम बंगालचा यानंतर ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक झाली. या दोघांची लव्हस्टोरी जितकी गाजली तितकाच या दोघांच्या नात्याचा अंत त्यांच्या फॅन्ससाठी वेदना देणारा ठरला आहे.
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध अँकर शिबानी दांडेकरने आयेशाचा एका युट्यूब चॅनलचा इंटरव्ह्यू घेतला होता. तीन वर्षांपूर्वी लंडनच्या रस्त्यावर शूट झालेल्या या व्हिडीओत आयेशाने आपलं खासगी जीवन, पहिल्या लग्नापासून घटस्फोट, शिखर धवनसोबत मैत्री आणि त्यानंतर झालेलं प्रेमी, तिचं टॅटू आणि फिटनेसबद्दलचं प्रेम आणि मुलगा झोरावरच्या जन्मावेळचे अनेक किस्से शेअर केले होते.
हे वाचलं का?
Shikhar Dhawan Divorce : शिखर-आयेशा घटस्फोट; पत्नीची भावनिक पोस्ट
फेसबूकवरचा फोटो पाहून प्रेमात पडला होता शिखर –
ADVERTISEMENT
फिटनेस बद्दल सजग असलेली आयेशा ही किक बॉक्सिंग खेळते. आपला बॉक्सिंग रिंगमधला एक फोटो तिने फेसबूकवर अपलोड केला होता. हा फोटो पाहूनच शिखर आयेशाच्या प्रेमात पडला होता. शिखर धवनने आयेशाला फ्रेड रिक्वेस्ट पाठवली होती, परंतू आयेशाने सुरुवातीला शिखरची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नव्हती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघेही मेसेजच्या माध्यमातून बोलायला लागले.
ADVERTISEMENT
यानंतर दोघांमध्ये नेहमी चॅटिंग व्हायचं. एका प्रसंगी शिखर आयेशासोबत चॅटिंग करत राहिला ज्यात ३ तास निघून गेले आणि तो विमानात बसणं विसरुन गेला होता. आयेशाची आई ही बंगाली असून तिचे वडील ऑस्ट्रेलियन आहेत. वयाच्या आठव्या वर्षी आयेशाने भारत सोडून ऑस्ट्रेलिया गाठलं. आयेशा आणि शिखर या दोघांनाही टॅटूचं प्रचंड वेड आहे. आपल्या उजव्या हातावर आयेशाने एक मोठा ओम चा टॅटू गोंदवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT