योगी आदित्यनाथ गिरवणार नवीन पटनाईकंचा कित्ता, 2032 Olympics पर्यंत भारतीय कुस्तीला स्पॉन्सरशीप
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी ७ पदकं मिळवत भारताने बहारदार कामगिरी केली. भारतीय हॉकी संघाला खडतर काळात आर्थिक सहाय्य करणाऱ्या ओडीशा सरकारचंही यानिमीत्ताने कौतुक झालं. आता उत्तर प्रदेशचं योगी आदित्यनाथ यांचं सरकारही नवीन पटनाईक यांचा कित्ता […]
ADVERTISEMENT
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी ७ पदकं मिळवत भारताने बहारदार कामगिरी केली. भारतीय हॉकी संघाला खडतर काळात आर्थिक सहाय्य करणाऱ्या ओडीशा सरकारचंही यानिमीत्ताने कौतुक झालं. आता उत्तर प्रदेशचं योगी आदित्यनाथ यांचं सरकारही नवीन पटनाईक यांचा कित्ता गिरवणार आहे.
ADVERTISEMENT
आगामी २०३२ ऑलिम्पिकपर्यंत उत्तर प्रदेश सरकारने भारतीय कुस्ती महासंघाला स्पॉन्सरशीप देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकार कुस्ती महासंघाला १७० कोटी रुपये देऊन खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा, चांगली मैदानं अशा सर्व सोयी पुरवणार असल्याचं कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. ओडीशा सरकारने हॉकीला दिलेल्या आर्थिक सहाय्यानंतर कुस्ती महासंघाने उत्तर प्रदेशकडे कुस्तीसाठी अशाच स्वरुपाच्या आर्थिक सहाय्याची मागणी केली होती, ज्याला योगी आदित्यनाथ यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
Tokyo Olympics : पहिल्याच प्रयत्नात रवी कुमारचं ‘चंदेरी’ यश
हे वाचलं का?
ओडीशा हे खूप लहान राज्य आहे. तरीही त्यांनी हॉकीला खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक सहाय्य आणि पाठींबा दिला. म्हणून आम्ही विचार केला की उत्तर प्रदेश जे सर्वात मोठं राज्य आहे ते कुस्तीला अशाप्रकारे का पाठींबा देऊ शकत नाही? आम्ही यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आमचा प्रस्ताव मान्य केला.
ब्रिजभुषण सिंग – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष
आम्ही दिलेल्या प्रस्तावात २०२४ पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला आम्ही १० कोटींचं सहाय्य मागितलं आहे. यानंतर २०२८ ऑलिम्पिकपर्यंत आम्ही १५ कोटी तर २०३२ ऑलिम्पिकपर्यंत २० कोटींचं सहाय्य मागितलं आहे. ही स्पॉन्सरशीप फक्त एलिट दर्जाच्या खेळाडूंपुरती मर्यादीत राहणार नसून कॅडेट लेव्हल आणि स्थानिक पातळीवर कुस्ती खेळणाऱ्या मल्लांनाही याचा फायदा होणार असल्याचं ब्रिजभुषण सिंग यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
कुस्तीपटू विनेश फोगाटवर निलंबनाची कारवाई, Tokyo Olympics मध्ये बेशिस्त वागणुकीचा ठपका
ADVERTISEMENT
२०१८ साली कुस्ती महासंघाने Tata Motors कंपनीला स्पॉन्सरशीपचे हक्क दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटार्स सोबतची स्पॉन्सरशीप कायम राहणार असून त्यांच्यासोबत कुस्ती महासंघ नव्याने करार करणार आहे. सध्याच्या घडीला फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या मल्लांना परदेशी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन मिळतं, परंतू आता कॅडेट लेव्हल कुस्तीतही महासंघ परदेशी प्रशिक्षकांना रुजू करण्याच्या प्रयत्नात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT