कुस्तीपटू विनेश फोगाटवर निलंबनाची कारवाई, Tokyo Olympics मध्ये बेशिस्त वागणुकीचा ठपका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची नुकतीच सांगता झाली. अखेरच्या दिवशी नीरज चोप्राने भालाफेकीत गोल्ड मेडल मिळवत सर्व भारतीयांना आनंदाचे क्षण दिले. नीरजच्या या यशाचं सेलिब्रेशन अजुनही सुरु असताना कुस्तीत मात्र कारवाईला सुरुवात झाली आहे. कुस्तीमहासंघाने महिला कुस्तीपटू विनेश फोगाटवर निलंबनाची कारवाई केली आहे. विनेशवर बेशिस्त वागणूकीचा ठपका ठेवण्यात आलाय.

ADVERTISEMENT

विनेशने टोकियोत इतर भारतीय कुस्तीपटूंसोबत सराव करण्यास नकार दिला होता. याचसोबत तिने सामन्यादरम्यान कुस्ती महासंघाचे अधिकृत स्पॉन्सर असलेली जर्सीही घातली नाही. त्यातच विनेशकडून पदकाची अपेक्षा असताना तिचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. इतकच नव्हे तर विनेशला रेपिचाजमध्ये खेळायची संधी मिळाली नाही. त्यामुळे कुस्ती महासंघ विनेश फोगाटवर नाराज असल्याचं कळतंय.

सध्या विनेशवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही तात्पुरत्या स्वरुपाची असली तरीही १६ ऑगस्टपर्यंत विनेशला आपलं उत्तर कुस्ती महासंघाला द्यायचं आहे. १६ तारखेपर्यंत कुस्ती महासंघाला जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर विनेश फोगाटवर जास्त काळासाठी निलंबनाची कारवाई होण्यचाी शक्यता आहे. दरम्यान कुस्ती महासंघाने सोनम मलिक या कुस्तीपटूलाही नोटीस पाठवली आहे.

हे वाचलं का?

Tokyo Olympics : पहिल्याच प्रयत्नात रवी कुमारचं ‘चंदेरी’ यश

हंगेरीत सराव केल्यानंतर विनेश थेट टोकियोत दाखल झाली होती. परंतू भारतीय खेळाडूंची सोय केलेल्या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहण्यासाठी तिने नकार दिला. इतकच नव्हे तर इतर भारतीय खेळाडूंसोबत सराव न करता विनेशने आपले परदेशी कोच वोलर अकोस यांच्यासोबत सराव करणं पसंत केलं. यंदाच्या स्पर्धेत भारताला कुस्तीतून दोन पदकं मिळाली. रवी कुमार दहिया आणि बजरंग पुनिया यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवून दिलं. परंतू महिला कुस्तीत विनेश फोगाटने निराशा केली. त्यामुळे विनेश आता आपली बाजू कशी मांडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

Tokyo Olympics 2020 : Bajrang Puniya ला कांस्यपदक, कझाकिस्तानच्या मल्लाचा उडवला धुव्वा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT