पाकिस्तानात झालेल्या ‘त्या’ स्पर्धेनंतर मिल्खा सिंग यांना संबोधलं जाऊ लागलं The Flying Sikh

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अॅथेलेटिक्समध्ये भारताचा झेंडा जगात रोवणारे भारतीय खेळाडू म्हणजे मिल्खा सिंग. मागच्या महिन्याभरापासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. मिल्खा सिंग यांचं रात्री उशिरा कोरोनाने निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा जीव मिल्खा सिंग आणि तीन मुली असं कुटुंब आहे. पाच दिवस आधीच मिल्खा सिंग यांच्या पत्नीचंही कोरोनामुळे निधन झालं.

ADVERTISEMENT

Milkha Sing यांच्या निधनानंतर अभिनेता फरहान अख्तरची भावूक पोस्ट…

Milkha Sing हे फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध होते. त्यामागे असलेला किस्सा अत्यंत रंजक आहे. मिल्खा सिंग यांनी 2016 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याबद्दल सांगितलं होतं. 1960 मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल अॅथलेटिक्स स्पर्धेत मिल्खा सिंग यांना भाग घेण्यासाठी बोलवलं गेलं होतं. भाग घेतला होता. फाळणीच्या जखमा मिल्खा सिंग विसरू शकले नव्हते, त्यामुळे ते पाकिस्तानात जाऊ इच्छित नव्हते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मिल्खा सिंग यांच्याशी चर्चा केली, त्यांची समजूत घातली. ज्यानंतर ते पाकिस्तानला जाण्यासाठी तयार झाले. पाकिस्तानात तेव्हा अब्दुल खालिक नावाचे एक अॅथलिट होते. पाकिस्तानला सर्वात वेगवान धावपटू म्हणून त्यांचा लौकिक होता.

हे वाचलं का?

स्पर्धा सुरू झाली तेव्हा जवळपास 60 हजार पाकिस्तानी फॅन्स हे अब्दुल खालिक यांच्यासाठी घोषणा देऊन त्यांचा उत्साह वाढवत होते. मात्र मिल्खा सिंग यांच्या वेगापुढे अब्दुल खालिक यांचा टिकाव लागला नाही. मिल्खा सिंग यांनी त्यांना हरवलं आणि त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती फिल्ड मार्शल अयूब खान मिल्खा सिंग यांना म्हणाले /तुम आज दौडे नहीं बल्की उडे हो’ The Flying Sikh हे नाव त्यांनी मिल्खा सिंग यांना दिलं आणि पुढे मिल्खा सिंग त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.

Milkha Sing: आता उरल्या फक्त आठवणी

ADVERTISEMENT

मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 ला पंजाबच्या गोविंदपुरामध्ये झाला. हा भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला. आपलं जन्मगाव फाळणीमुळे पाकिस्तानात गेलं ही सल मिल्खा सिंग यांच्या मनात कायम राहिली. एवढंच नाही तर मिल्खा सिंग यांचे आई वडील, तसंच त्यांचे आठ बहीण-भाऊ फाळणीच्या वेळी जे दंगे झाले तेव्हा मारले गेले. त्यामुळे फाळणीची जखम त्यांच्या मनात घर करून राहिली होती.

ADVERTISEMENT

मिल्खा सिंग यांनी काय सांगितलं?

फाळणी झाली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या आई वडिलांना आणि बहीण भावांना मारण्यात आलं. मी कसाबसा लपून, जीव वाचवत दिल्लीला पोहचलो. प्रचंड भूक लागली होती. कुणीतरी मला शरणार्थी शिबीरांबाबत सांगितलं मी तिथे पोहचलो. त्यावेळी मला भाकरी खायला मिळाली. जेव्हा पोटात भूक असते तेव्हहा देशाचा विचार कुणी करत नाही. भूकेने मला संघर्ष करायला शिकवला, त्यानंतर मी देशाचा विचार करू लागलो. माझ्यासमोर माझ्या आई वडिलांची जी हत्या झाली ती मी कधीही विसरू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT