WTC Final : Nuteral Venue वर भारत विरुद्ध न्यूझीलंड लढतीचा इतिहास काय सांगतो?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल मॅच सुरु होणार आहे. साऊदम्पटनच्या मैदानावर ही मॅच रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी ही उल्लेखनीय राहिली आहे. न्यूझीलंडचा संघही तितकाच तुल्यबळ आहे. परंतू या लढतीत एक बाब भारतीय संघाला विसरुन चालणार नाही. ही बाब म्हणजे तटस्थ मैदानावर खेळवला जाणारा सामना. भारतीय संघ पहिल्यांदाच […]
ADVERTISEMENT
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल मॅच सुरु होणार आहे. साऊदम्पटनच्या मैदानावर ही मॅच रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी ही उल्लेखनीय राहिली आहे. न्यूझीलंडचा संघही तितकाच तुल्यबळ आहे. परंतू या लढतीत एक बाब भारतीय संघाला विसरुन चालणार नाही. ही बाब म्हणजे तटस्थ मैदानावर खेळवला जाणारा सामना.
ADVERTISEMENT
भारतीय संघ पहिल्यांदाच एखाद्या तटस्थ मैदानावर टेस्ट क्रिकेट खेळत आहे. तुलनेत न्यूझीलंडच्या संघाने याआधी तटस्थ मैदानावर कसोटी सामना खेळला आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळत नसताना पिचची कंडीशन, हवामान या सर्व गोष्टींशी जुळवून भारताला न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. दुर्दैवाने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत झालेल्या तटस्थ लढतींचा इतिहास हा भारताच्या बाजूने नाहीये.
WTC Final : पाऊस क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर पाणी फिरवणार? जाणून घ्या Southampton मधला हवामानाचा अंदाज
हे वाचलं का?
१९७५ सालपासून सुरु झालेल्या विश्वचषक लढतींमध्ये फक्त एकदाच भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तटस्थ मैदानात जिंकला आहे. जाणून घ्या या लढतींचे निकाल –
१) भारत विरुद्ध न्यूझीलंड – वर्ष १९७५ (विश्वचषक) – न्यूझीलंड विजेता
ADVERTISEMENT
२) भारत विरुद्ध न्यूझीलंड – वर्ष १९७९ (विश्वचषक) – न्यूझीलंड विजेता
ADVERTISEMENT
३) भारत विरुद्ध न्यूझीलंड – वर्ष १९९९ (विश्वचषक) – न्यूझीलंड विजेता
४) भारत विरुद्ध न्यूझीलंड – वर्ष २००० (चॅम्पिअन्स ट्रॉफी) – न्यूझीलंड विजेता
५) भारत विरुद्ध न्यूझीलंड – वर्ष २००३ (विश्वचषक) – भारत विजेता
६) भारत विरुद्ध न्यूझीलंड – वर्ष २००७ (टी-२० विश्वचषक) – न्यूझीलंड विजेता
७) भारत विरुद्ध न्यूझीलंड – वर्ष २०१९ (विश्वचषक) – न्यूझीलंड विजेता
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), ऋषभ पंत (विकेट किपर), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला १२ कोटींच्या घरात रक्कम आणि मानाची गदा मिळणार आहे. ICC ने याबद्दल अधिकृत पत्रक काढून माहिती दिली. पराभूत संघाला आयसीसीकडून ५ कोटींच्या घरात रक्कम मिळणार असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला ३ कोटींच्या घरात रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला २ कोटी तर उर्वरित संघांना आयसीसी ७३ लाखांच्या घरात बक्षीस देणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT