WTC Final : पहिल्याच दिवशी पावसाचा व्यत्यय, पहिल्या सत्राचा खेळ वाया
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणण्यास सुरुवात केली आहे. साऊदम्प्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलंय. Update: Unfortunately there will be no play in the first session on Day 1 of the ICC World Test Championship final. #WTC21 — […]
ADVERTISEMENT
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणण्यास सुरुवात केली आहे. साऊदम्प्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलंय.
ADVERTISEMENT
Update: Unfortunately there will be no play in the first session on Day 1 of the ICC World Test Championship final. #WTC21
— BCCI (@BCCI) June 18, 2021
मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी झाकून ठेवली असून अंपायर्स आणि सामनाधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. परंतू पुढील ५ दिवसांच्या खेळात किमान ३ दिवस पावसाचा अंदाज असल्यामुळे चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे.
तब्बल दोन वर्ष सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं. पावसामुळे खेळ वाया गेल्यास आयसीसीने या स्पर्धेसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. परंतू तरीही सामना अनिर्णित राहिला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचं विजेतेपद विभागून देण्यात येणार आहे.
हे वाचलं का?
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), ऋषभ पंत (विकेट किपर), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी
ADVERTISEMENT
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला १२ कोटींच्या घरात रक्कम आणि मानाची गदा मिळणार आहे. ICC ने याबद्दल अधिकृत पत्रक काढून माहिती दिली. पराभूत संघाला आयसीसीकडून ५ कोटींच्या घरात रक्कम मिळणार असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला ३ कोटींच्या घरात रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला २ कोटी तर उर्वरित संघांना आयसीसी ७३ लाखांच्या घरात बक्षीस देणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT