WTC Final : विराट कोहलीचा विक्रम, दिग्गज कॅप्टन्सना टाकलं मागे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पहिला दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेल्यानंतर साऊदम्प्टनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्याला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली. पावसाने उसंत घेतल्यानंतर टॉस झाला, ज्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने बाजी मारत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही या सामन्यात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

ADVERTISEMENT

WTC Final : पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया, Reserve Day ची तरतूद लागू होणार?

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ६१ वा कसोटी सामना ठरला आहे. यावेळी विराटने महेंद्रसिंह धोनीचा ६० कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व करण्याचा विक्रम मोडला आहे. इतकच नव्हे तर विराट कोहली आशिया खंडात सर्वाधिक कसोटी सामन्यांत आपल्या देशाचं नेतृत्व करणारा कॅप्टन ठरला आहे.

हे वाचलं का?

याव्यतिरीक्त विराट कोहलीने भारताबाहेर सर्वाधिक टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करण्याच्या धोनीच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

न्यूझीलंडने या सामन्यासाठी आपल्या संघात स्पिनरला संधी दिलेली नाही. तर दुसरीकडे भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडीने साऊदी-बोल्ट जोडीचा नेटाने सामना करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यामुळे आता पहिल्यांदा बॅटींग करताना टीम इंडिया कितीपर्यंत मजल मारते याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT