WTC Final : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी रविंद्र जाडेजाचं पुनरागमन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये रंगणाऱ्या World Test Championship च्या फायनल मॅचसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. चेतन चौहान यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. Test Championship ही २०१९ साली आयसीसीने सुरु केलेली महत्वाची स्पर्धा आहे. कसोटी क्रिकेटचा वर्ल्डकप अशी या स्पर्धेला ओळख निर्माण झालेली असल्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ कसा सामना करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. अंतिम फेरीत भारतासमोर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचं आव्हान असणार आहे.

ADVERTISEMENT

घरच्या मैदानावर इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत करुन विराट कोहलीच्या भारतीय संघाने WTC फायनलचं तिकीट मिळवलं आहे. नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांना यंदाच्या संघात स्थान मिळालेलं नाही.

World Test Championship साठी असा असेल भारताला संघ –

हे वाचलं का?

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव

याव्यतिरीक्त वृद्धीमान साहा आणि लोकेश राहुल यांच्या फिटनेस टेस्टचा रिपोर्ट अद्याप आलेला नसल्यामुळे त्यांच्या सहभागाबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याव्यतिरीक्त बीसीसीआयने अभिमन्यू इश्वरन, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि अरझान नागवासवाला यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून स्थान दिलं आहे. WTC फायनल नंतर इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही भारताचा हाच संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT