WTC Final : विराटने संधी दवडली, सोशल मीडियावर फॅन्स नाराज; म्हणाले आता तरी रोहितला कॅप्टन करा !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पुन्हा एकदा आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेत विजय मिळवण्यात अपयश आलंय. इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडने भारतावर ८ विकेटने मात केली आणि पहिलं वहिलं विजेतेपद पटकावलं. पहिल्या ५ दिवसांपैकी २ दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे हा सामना अनिर्णित राहील असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता..

ADVERTISEMENT

परंतू अखेरच्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने सामन्याचं पारडं आपल्या बाजूला फिरवलं. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघाने केलेला निराशाजनक खेळ चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त करत विराट कोहली आणि रवी शास्त्री जोडीला हटवून रोहित शर्माकडे संघाचं कर्णधारपद देण्याची मागणी केली आहे.

पावसामुळे वाया गेलेले दोन दिवस आणि उरलेल्या दिवसांमध्ये अंधुक प्रकाशामुळे लवकर थांबवावा लागलेला खेळ यामुळे हा अंतिम सामना राखीव दिवसापर्यंत ढकलला जाणार हे स्पष्ट झालं होतं. अखेरच्या दोन दिवसांमध्ये पावसाने उसंत घेतली. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी शिस्तबद्ध मारा करत दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची दाणादाण उडवली. ऋषभ पंत आणि रोहित शर्माचा अपवाद वगळता एकही भारतीय बॅट्समन दुसऱ्या डावात आश्वासक खेळी करु शकला नाही. ज्यामुळे भारताने १७० रन्सपर्यंत मजल मारत न्यूझीलंडला विजयासाठी १३९ रन्सचं आव्हान दिलं.

हे वाचलं का?

अखेरच्या दिवशी ६० ओव्हर्सचा खेळ बाकी असताना भारताला संयमी खेळ करण्याची गरज होती. परंतू ऋषभ पंतसह अखेरच्या फळीतल्या बॅट्समननी विकेट फेकत न्यूझीलंडसमोर आव्हान सोपं करुन ठेवलं. रविचंद्रन आश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतू अनुभवी रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT