T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध सामना जिंकूनही न्यूझीलंडची चिंता कायम, भारतासाठी आनंदाची बातमी

गप्टीलच्या इनिंगमुळे न्यूझीलंडची सामन्यात १७२ पर्यंत मजल
T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध सामना जिंकूनही न्यूझीलंडची चिंता कायम, भारतासाठी आनंदाची बातमी
फोटो सौजन्य - AP

टी-२० विश्वचषकात भारताचा समावेश असलेल्या ब गटात उपांत्य फेरी गाठण्याची लढत आता चुरशीची झाली आहे. सलग दोन सामने गमावलेल्या भारतासाठी आजची न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड ही लढत महत्वाची होती. स्कॉटलंड या सामन्यात विजयी व्हावं अशी इच्छा अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींनी मनात बाळगली होती. प्रत्यक्ष सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडवर १६ धावांनी मात केली.

परंतू विजयाचं अंतर अगदी कमी धावांचं असल्यामुळे न्यूझीलंड आपल्या नेट रनरेटमध्ये सुधारणा करु शकली नाही. ज्याचा फायदा टीम इंडियाला घेता येऊ शकतो.

अफगाणिस्तानविरुद्ध आजच्या सामन्यात भारताने जर मोठ्या फरकाने सामना जिंकला तर सेमी फायनलच्या शर्यतीत भारताची आशा अजुनही कायम असणार आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मिचेल, विल्यमसन आणि कॉनवे हे तिन्ही फलंदाज आज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. परंतू मार्टीन गप्टीलने एकाकी झुंज देत तुफान फटकेबाजी केली. त्याने ५६ बॉलमध्ये ६ फोर आणि ७ सिक्स लगावत ९३ रन्स केल्या. या इनिंगच्या जोरावर न्यूझीलंडने १७२ धावांपर्यंत मजल मारली.

प्रत्युत्तरादाखल स्कॉटलंडच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. कोएत्झर, मुन्सी आणि क्रॉस यांनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये चांगली फटकेबाजी केली. मॅथ्यू क्रॉसने न्यूझीलंडच्या मिल्नेच्या बॉलिंगवर पाच चौकार लगावत सर्वांची वाहवा मिळवली. परंतू इश सोधीने ही जोडी फोडली आणि न्यूझीलंडला पहिलं यश मिळवून दिलं. मधल्या ओव्हर्समध्ये न्यूझीलंडने सामन्यावर चांगलं वर्चस्व मिळवलं होतं. परंतू मिचेल फ्लिक्सने काही सुंदर फटके खेळत न्यूझीलंड मोठ्या फरकाने सामना जिंकणार नाही याची काळजी घेतली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in