T20 World Cup : हार्दिक की शार्दुल? न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी विराट कोहलीसमोर यक्षप्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाकिस्तानविरुद्ध सलामीचा सामना गमावल्यानंतर बरोबर एक आठवड्याने भारताचा संघ रविवारी न्यूझीलंडविरुद्ध आपला दुसरा सामना खेळेल. या सामन्यासाठी भारतीय संघ सध्या कसून सराव करतोय. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. परंतू विराट कोहलीसमोर या सामन्यात Playing XI मध्ये कोणाला संधी द्यायची हा यक्षप्रश्न असणार आहे.

हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा प्रश्न –

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात बॅटींगदरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो गोलंदाजी करु शकला नाही. हार्दिक पूर्ण जोशाने गोलंदाजी करु शकत नसल्यामुळे टीम इंडियासाठी एका अतिरीक्त गोलंदाजांचा प्रश्न तयार झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी हार्दिकचा फिटनेस पूर्ववत झाला असून त्याने काही काळ नेट्समध्ये गोलंदाजीचा सरावही केला. परंतू प्रत्यक्ष सामन्यात त्याला संधी मिळते की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हार्दिक नाही तर मग संधी द्यायची कोणाला?

परंतू विराट कोहलीसाठी ही समस्या इथपर्यंतच थांबत नाही. हार्दिक पांड्याला जर संघात स्थान द्यायचं नाही असं ठरलं तर त्याच्याऐवजी कोणत्या खेळाडूला संघात संधी मिळणार हा देखील एक प्रश्नच आहे. यासाठी बॉलिंग आणि बॅटींग दोन्ही करु शकणारा मुंबईकर शार्दुल ठाकूर हार्दिक पांड्याचं स्थान पटकावण्यासाठी शर्यतीत आहे.

ADVERTISEMENT

परंतू टीम इंडियाचं मॅनेजमेंट आणि विशेषकरुन धोनीला हार्दिक पांड्यावर विश्वास आहे. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात अंतिम ११ जणांचा संघ निवडताना विराटला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

T20 World Cup: ‘खेळाडूंना नाउमेद करु नका, न्यूझीलंडविरुद्ध सामना आपण जिंकू मग चित्र बदललेलं दिसेल’

शार्दुल ठाकूर सोबतच टीम इंडियाकडे इशान किशनचा एक पर्याय उपलब्ध आहे. परंतू हार्दिकच्या जागेवर इशान किशनला संधी द्यायची असेल तर त्याला अतिरीक्त फलंदाज म्हणून खेळवावं लागेल. ज्यामुळे अतिरीक्त गोलंदाजीचा भारताचा प्रश्न तसाच कायम राहतो. त्यामुळे या प्रश्नावर आता विराट कोहली आणि टीम इंडियाचं मॅनेजमेंट कसं उत्तर काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

BLOG : याला कारण एकच…आम्हाला पराभव सहन होत नाही !

    follow whatsapp

    ADVERTISEMENT