T20 World Cup : ६-० च्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार, पाकिस्तानविरुद्ध आज महामुकाबला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज दोन वर्षांनी क्रिकेटचा सामना रंगणार आहे. टी-२० विश्वचषकात दुबईच्या मैदानावर हे दोन प्रतिस्पर्धी समोरासमोर येतील. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या निमीत्ताने दुबईकडे असणार आहे. दोन्ही देशांमध्ये बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे क्रिकेटच्या मालिका खेळवल्या जात नाहीत, त्यामुळे भारत-पाकिस्तान हे संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात.

वर्ल्डकप स्पर्धेत भारत आतापर्यंत एकदाही पाकिस्तानविरुद्ध पराभूत झालेला नाही. हा ट्रॅक रेकॉर्ड भारताच्या बाजूने असला तरीही बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघानेही आपल्या शेवटच्या ६ टी-२० सामन्यांमध्ये पराभव पाहिलेला नाहीये. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होणार यात काही शंकाच नाही.

टी-२० विश्वचषकात आतापर्यंत भारताने पाकिस्तानवर ५ वेळा विजय मिळवला आहे. आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाच्या कामगिरीवर एक नजर –

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) २००७ टी-२० विश्वचषक – (डरबन आणि जोहान्सबर्ग)

साखळी सामन्यात भारताची पाकिस्तानवर Bowl Out मध्ये मात

ADVERTISEMENT

अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारत ५ धावांनी विजयी

ADVERTISEMENT

२) २०१२ टी-२० विश्वचषक – (कोलंबो)

भारताची पाकिस्तानवर ८ विकेटने मात

T20 WC, Ind Vs Pak: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, पाहा कोण-कोण असणार संघात

३) २०१४ टी-२० विश्वचषक – (ढाका)

भारताची पाकिस्तानवर ७ विकेटने मात

४) २०१६ टी-२० विश्वचषक – (कोलकाता)

भारत पाकिस्तानविरुद्ध ६ विकेटने विजयी

T20 WC: Captain पदाबाबत प्रश्न विचारताच विराट कोहली भडकला…

महत्वाची गोष्ट म्हणजे यंदाचा टी-२० विश्वचषक हा युएईत होणार असून भारतीय खेळाडू याच ठिकाणी काही दिवसांपुर्वी आयपीएलचे सामने खेळले आहेत. याचसोबत महेंद्रसिंह धोनीचं संघात मेंटॉर म्हणून असणंही संघासाठी फायदेशीर ठरु शकतं. परंतू युएई आणि विशेषकरुन दुबईचं मैदानही पाकिस्तानचं गेल्या काही वर्षांमधलं होमग्राऊंड आहे. त्यामुळे बाबर आझमच्या संघाला इथल्या खेळपट्ट्यांचा चांगलाच अंदाज आहे. त्यामुळे आजच्या दिवशी लढतीत कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT