T20 World Cup : भारताच्या कामगिरीसाठी IPL ला दोष देणं योग्य ठरणार नाही – गौतम गंभीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा आजचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. टीम इंडियाच्या या खराब कामगिरीनंतर सर्वच स्तरातून आयपीएलच्या आयोजनाला दोष दिला जातो आहे. परंतू माजी खेळाडू गौतम गंभीरच्या मते भारताच्या या खराब कामगिरीसाठी आयपीएलला दोष देणं योग्य ठरणार नाही.

सलग दोन पराभवांमुळे भारताचं सेमी फायनलंमधलं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. परंतू टीम इंडियाने या सर्व गोष्टींचा विचार न करता चांगली कामगिरी करण्याकडे भर द्यावा असं मत गंभीरने व्यक्त केलं आहे.

वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुनही विराटची गच्छंती? BCCI मध्ये हालचालींना सुरुवात

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“तुम्ही आयपीएलला दोष देऊ शकत नाही. जर भारतीय संघासोबत कधीही काहीही वाईट घडतं तेव्हा आयपीएलकडे बोटं दाखवली जातात. हे चुकीचं आहे. कधीतरी तुम्हाला ही गोष्ट मान्यच करावी लागेल की २-३ संघ या स्पर्धेत तुमच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळले. जेवढ्या लवकर आपण हे मान्य करायला शिकू तेवढं आपल्यासाठी हे चांगलं ठरेल”, गंभीर Star Sports वाहिनीवर बोलत होता.

New Zealand विरुद्ध मालिकेत भारताचं नेतृत्व लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता

ADVERTISEMENT

भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चीत करायचं असेल तर उर्वरित तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकून दुसऱ्या संघाच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे. “अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही. त्यांची बॉलिंग लाईन-अप श्रीलंका, बांदलादेश या संघांपेक्षा चांगली आहे. भारताने सर्वात आधी सामना जिंकण्याकडे लक्ष द्यावं, सध्या नेट रनरेटकडे लक्ष देऊ नका असा सल्ला मी देईन. ज्या क्षणी तुम्ही सामन्यात वरचढ होता तेव्हा मग परिस्थितीनुसार खेळ करता येतो.” गंभीर अफगाणिस्तानविरुद्ध सामन्याबद्दल बोलत होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT