टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी?

ऑक्‍टोबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-20 विश्वचषकासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी?

ऑक्‍टोबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-20 विश्वचषकासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, टीम इंडियाचे ते 15 खेळाडू कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज BCCI कडून भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या निवड समितीची आज मुंबईत बैठक होणार आहे, ज्यामध्ये वर्ल्ड कप टीमची निवड होण्याची शक्यता आहे. आज रात्रीपर्यंत त्याविषयी माहिती समोर येईल.

आशिया कप- 2022 मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघानं आपला लक्ष विश्वचषकावरती केंद्रीत केलं आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आशिया चषकातील चुकांची पुनरावृत्ती करायची नाही. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहे.

विश्वचषकासाठी हा असू शकतो भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, अरशप सिंह, अक्षर पटेल.

रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे मोठा तोटा

आशिया चषकादरम्यान रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, मात्र तो टी-20 विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे. कारण रवींद्र जडेजाला तंदुरुस्त होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिकाही खेळायची आहे, त्यामुळे या दोन्ही मालिकेसाठीही टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तीन T-20 मालिका)

पहिला T-20 सामना (20 सप्टेंबर) - मोहाली

दुसरा T-20 सामना (23 सप्टेंबर) - नागपूर

तिसरा T-20 सामना (25 सप्टेंबर) - हैदराबाद

दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तीन T-20 मालिका)

पहिला T-20 सामना (28 सप्टेंबर) - तिरुवनंतपुरम

दुसरा T-20 सामना (2 ऑक्टोबर) - गुवाहाटी

तिसरा T-20 सामना (4 ऑक्टोबर) - इंदूर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका)

पहिली एकदिवसीय (6 ऑक्टोबर) - लखनौ

दुसरी एकदिवसीय (9 ऑक्टोबर) - रांची

तिसरी एकदिवसीय (11 ऑक्टोबर) - दिल्ली

विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 17 ऑक्टोबर - गाबा

भारत विरुद्ध न्यूझीलंड - 19 ऑक्टोबर - गाबा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in