Tokyo Olympics 2020 : भारताच्या खात्यात आणखी एक रौप्यपदक, कुस्तीपटू रवी कुमार अंतिम फेरीत पराभूत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

५७ किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये सुवर्णपदकाचं भारताचं स्वप्न भंगलेलं आहे. भारताच्या रवी कुमारला अंतिम फेरीत रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या झावुरकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. ७-४ च्या फरकाने रशियन खेळाडूने या सामन्यात बाजी मारत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

पहिल्या सेटच्या सुरुवातीला दोन्ही मल्ल एकमेकांचा अंदाज घेण्यात वेळ वाया घालवत होते. परंतू कालांतराने रशियाच्या मल्लाने आपली आक्रमकता दाखवत दोन गुणांची कमाई केली. परंतू रवी कुमारने हार न मानता लगेच कमबॅक करत भारंदाज डाव टाकत दोन गुणांची कमाई करत बरोबरी साधली. परंतू रशियाच्या झावुर उग्वेवने पुन्हा एकदा कमबॅक करत २ गुण कमावत आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रातही रशियन खेळाडूच्या आक्रमकतेपुढे रवीचा निभाव लागत नव्हता. रवी कुमारला मैदानाबाहेर करत झावुरने आणखी एका गुणाची कमाई केली. प्रत्येकवेळा रवी कुमार रशियन खेळाडूवर पकड घेण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याचे प्रयत्न फोल ठरत होते. दरम्यानच्या काळात रशियाच्या झावुरने आपली आघाडी वाढवली. रवी कुमारने अखेपर्यंत आपले प्रयत्न न सोडता सामना संपायला १ मिनीट बाकी असताना दोन गुणांची कमाई केली. शेवटच्या २० सेकंदात ४-७ अशा पिछाडीवर पडलेल्या रवी कुमारने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतू रशियन मल्लाच्या बचावापुढे त्याचा निभाव लागला नाही. अखेरीस पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या रवी कुमारला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT