Gold Medalist नीरज चोप्राचे हात होणार आणखी बळकट, TOPS योजनेतून मिळणार आर्थिक सहाय्य

'साई'कडून नीरज चोप्राला 5.5 लाखांचं वाढीव आर्थिक सहाय्य, पुढचे 14 दिवस नीरज टर्कीत सराव करणार
Gold Medalist नीरज चोप्राचे हात होणार आणखी बळकट, TOPS योजनेतून मिळणार आर्थिक सहाय्य

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचे हात आता आणखी बळकट होणार आहेत. Sports Authority of India अर्थात SAI (साई) ने नीरज चोप्राला आगामी महत्वाच्या स्पर्धांसाठी टर्कीत सराव करायला मुदतवाढ आणि आर्थिक सहाय्य जाहीर केलं आहे.

TOPS (Target Olympic Podium Scheme) योजनेअंतर्गत नीरज चोप्राला 'साई'ने 5.5 लाखांचं वाढीव आर्थिक सहाय्य मंजूर केलं आहे. सध्या नीरज टर्की येथील ग्लोरिया स्पोर्ट्स अरेना इथे सराव करतो आहे. नीरज आणि त्याचे प्रशिक्षक क्लाऊस बार्तोनीएत्झ मार्च 2022 पासून टर्कीमध्येच सराव करत आहेत. आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई खेळ आणि Athletics World Championship या स्पर्धांच्या तयारीसाठी नीरज चोप्रा पुढचे 14 दिवस टर्कीमध्येच सराव करणार आहे.

नीरज चोप्राला देण्यात आलेल्या वाढीव आर्थिक सहाय्यात त्याचा ग्लोरिया स्पोर्ट्स अरेना येथे सराव करायचा खर्च, राहणं-खाणं, प्रवास आणि वैद्यकीय विमा हे खर्च कव्हर करण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त नीरज आणि त्याच्या प्रशिक्षकांना प्रत्येक दिवशी इतर खर्चासाठी 50 अमेरिकन डॉलर्स देण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.