टीम इंडिया साऊदम्पटनमध्ये दाखल, क्वारंटाइन कालावधीत ३ दिवस कोणालाही भेटता येणार नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. जून महिन्यात १८ तारखेपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. १८ ते २२ जून या कालावधीत साऊदम्पटनमध्ये हा सामना रंगेल. कोरोनाची परिस्थिती पाहता भारतीय संघाला साऊदम्पटनमध्ये क्वारंटाइनचे कडक नियम पाळावे लागणार आहेत.

WTC Final : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी रविंद्र जाडेजाचं पुनरागमन

टीम इंडियाचा संघ विमानाने इंग्लंडला दाखल होत असतानाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने भारताच्या क्वारंटाइन शेड्य़ुलबद्दल माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, आयसीसीने शुक्रवारी जून महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या World Test Championship साठीचे नियम आणि Playing Conditions जाहीर केल्या आहेत. या नियमांमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते (Joint Winners) म्हणून घोषित करण्यात येणार आहे. याचसोबत पावसामुळे एक दिवसाचा खेळ वाया गेला तर आयसीसीने राखीव दिवसाचीही सोय केली आहे. गेल्या दोन वर्षापासून आयसीसीची ही महत्वांकाक्षी स्पर्धा सुरु आहे, ज्याचा शेवट भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने होणार आहे.

जाणून घेऊयात काय आहेत या स्पर्धेचे नियम आणि Playing Conditions?

ADVERTISEMENT

  1. सामन्यादरम्यान जर कोणत्याही कारणामुळे दिवस वाया जाणार असेल तर सामनाधिकारी दोन्ही संघ आणि प्रसारमाध्यमांना Reserve Day वापराबद्दल माहिती देतील. परंतू राखीव दिवसाचा वापर करायचा की नाही याचा निर्णय पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात घेतला जाईल.

ADVERTISEMENT

  • फायनल मॅच Grade 1 Dukes Ball ने खेळवली जाईल.

  • सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.

  • याव्यतिरीक्त WTC च्या फायनल मॅचमध्ये काही नियमांमध्ये बदल होणार आहे. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील वन-डे मालिकेदरम्यान आयसीसीने लागू केलेले नवीन नियम WTC फायनलमध्येही लागू केले जाणार आहेत.

    Short Run – थर्ड अंपायर शॉर्ट रन संदर्भात निर्णय घेऊन ते मैदानावर अंपायरना याबद्दल माहिती देतील.

    Player Review – अंपायरने LBW च्या दिलेल्या निर्णयाविरोधात DRS घेण्याआधी फिल्डर किंवा बॅट्समन अंपायरला बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला आहे की नाही हे विचारु शकतात.

    DRS Review – LBW च्या रिव्ह्यूसाठी विकेट झोनचं हाईट मार्जिन हे स्टम्पवर वाढवण्यात आलं आहे. Umpires Call साठी स्टम्पची उंची आणि लांबी हे दोन घटक लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT