विराट कोहलीनं सांगितला बायो बबलचा अनुभव; फोटो शेअर करत म्हणाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली चर्चेत आहे. विराट कोहलीने संघाचं नेतृत्व करण्याबद्दलचा मोठा निर्णय जाहीर केला. तसेच आयपीएलमधील आरसीबीचं नेतृत्व सोडण्याचाही निर्णय घेतला. कोहलीबद्दल अनेक विषयांवर चर्चा सुरू आहेत. दरम्यान, कोहलीने एक फोटो ट्वीट करत आयपीएल आणि भारतीय संघाच्या बायो-बबल दौऱ्यांबद्दलचा अनुभव शेअर केला आहे.

विराट कोहलीने स्वतःचा खुर्चीला बांधलेला एक फोटो ट्वीट केला. हा फोटो ट्वीट करून त्याने एअर बबलमध्ये खेळवण्यात आलेल्या क्रिकेट मालिकांचा अनुभव शेअर केला आहे. बायो-बबलमध्ये खेळताना असाच अनुभव असतो, असं कॅप्शन कोहलीने या फोटोला दिलं आहे.

IPL BLOG: देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा फोटो ट्वीट केल्यानंतर विराटला त्यावरून ट्रोलही केलं जात आहे. अनेकजणांनी हाच फोटो कमेंटमध्ये पोस्ट करत त्याला ट्रोल केलं आहे. तर काहींनी विराटचा नव्या जर्सीतील फोटो ट्वीट केला आहे.

काय असतं बायो-बबल?

ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाचा उद्रेक होत असताना आयपीएल प्रेक्षकांविना खेळवण्याबरोबरच खेळाडूंच्या आरोग्याबद्दल काळजी घेण्यासाठी आयपीएल बायो-बबलमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ADVERTISEMENT

तुम्हाला या स्टार क्रिकेटर्सचे निक नेम माहितीयेत?

बायो-बबल्स ही काहीशी विलगीकरणा करून घेण्यासारखीच संकल्पना आहे. यामध्ये सॅनिटाइज करण्यात आलेल्या एखाद्या ठराविक परिसरामध्ये किंवा ठिकाणावर ठरवून दिलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. बायो-बबल्समध्ये प्रवेश देण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची करोना चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक असतं.

बायो-बललमधील जागा या एखाद्या विलगीकरण केंद्रासारखीच असते. गर्दी टाळण्यासाठी अगदीच मोजक्या व्यक्तींना तेथे प्रवेश दिला जातो. बाहेरच्या जगाशी केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या व्यक्तींचा संपर्क असतो. एकदा का बायो-बबल्समधील व्यक्तीला बाधा झाली ती त्या बबल्समध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येत नाही किंवा नव्या व्यक्तीला त्या परिसरामध्ये प्रवेश दिला जात नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT