Dhoni ला कर्णधार करण्यावरुन माझ्या मनात शंका होती, पवारांनी सांगितला भारताच्या कॅप्टन निवडीचा किस्सा

सचिनच्या सांगण्यावरुन धोनीला भारतीय संघाचं कर्णधारपद मिळालं
Dhoni ला कर्णधार करण्यावरुन माझ्या मनात शंका होती, पवारांनी सांगितला भारताच्या कॅप्टन निवडीचा किस्सा
फाईल फोटो

भारताचा 2007 च्या दरम्यान इंग्लंडचा दौरा होता. त्यावेळी आपल्या संघाचा कर्णधार राहुल द्रविड होता.मात्र बॅटिंग परिणाम होत असल्याने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि हे पद सचिन देखील घेण्यास तयार नव्हता.मात्र त्यावेळी सचिनने महेंद्रसिंग धोनीचे नाव सुचविले आणि त्याच्या सांगण्या वरून धोनीला कर्णधार केल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.

एजल फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीच्या वतीने पद्मभूषण चंदू बोर्डे यांचा विशेष सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी शरद पवार हे बोलत होते.तर त्या दरम्यान शरद पवार यांनी क्रिकेट क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा देखील दिला.

फाईल फोटो
IPL च्या उभारणीत ललित मोदींचं योगदान होतं ही वस्तुस्थिती - शरद पवार

यावेळी शरद पवार म्हणाले की, "मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना 2007 च्या दरम्यान इंग्लंडचा दौरा होता आणि त्यांच्या सोबत आपला सामना झाला होता. त्यानंतर आपला संघाचा कर्णधार राहुल द्रविड माझ्याकडे आला आणि म्हणाला कर्णधार असल्याने माझ्या बॅटिंगवर परिणाम होत आहे. म्हणून मी कर्णधार पद सोडत आहे. त्यानंतर नव्या कर्णधारचा प्रश्न निर्माण झाला. त्यावर मी सचिनला बोलावून घेतले आणि द्रविड कर्णधार पद सोडत आहे तर तू कर्णधार पद भूषवावे असं सांगितलं."

परंतू सचिनने यासाठी नकार दिला. त्यामुळे आणखी गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी सचिनने एका युवा क्रिकेटरचा नाव सुचवलं की, याला कर्णधार करा हा खेळाडू देशाचं नवा पुढे करेल, तो खेळाडू कोण तर तो महेंद्रसिंग धोनी हा खेळाडू होता. यानंतर त्याला कर्णधार पद देण्यात आले. तेव्हा माझ्या मनात धोनीला कर्णधार करण्यावरून शंका होती पण त्यानंतर महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात आपल्या देशाने चांगलीच कामगिरी केल्याचे सांगत, शरद पवारांनी धोनीकडे भारतीय संघाचे नेतृत्व कसे आलं याची माहिती दिली.

Related Stories

No stories found.