IPL 2020 in UAE : आव्हान कायम राखण्यासाठी टॉप ४ मधील संघांना काय करावं लागेल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनामुळे भारतात खेळवण्यात येत असलेला आयपीएलचा चौदावा हंगाम मध्यावधीत स्थगित करावा लागल्यानंतर उद्यापासून युएईत उर्वरित हंगामाला सुरुवात होते. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सध्याच्या घडीला दिल्ली, चेन्नई, बंगळुरु आणि मुंबई हे चार संघ टॉप ४ च्या रेसमध्ये आहेत.

उर्वरित संघांपैकी सनराईजर्स हैदराबादचं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. याव्यतिरीक्त राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यां संघांनाही टॉप फोर मध्ये येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम युएईत खेळवण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक संघाला नवीन रणनिती आखून मैदानात उतरावं लागणार आहे. अशा परिस्थितीत जे संघ सध्या टॉप ४ च्या पोजिशनवर आहेत. त्यांना आपलं स्थान आणि आव्हान कायम राखण्यासाठी काय करावं लागेल याचा आढावा आपण घेणार आहोत.

एका क्लिकवर जाणून घ्या IPL 2021 च्या उर्वरित सिझनचं Time Table

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) दिल्ली कॅपिटल्स – ८ सामने, ६ विजय, २ पराभव, १२ गुणांसह पहिलं स्थान

पहिल्या हंगामात केलेली दमदार सुरुवात ही बाब दिल्ली कॅपिटल्ससाठी आश्वासक ठरणार आहे. परंतू मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींगने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या संघाला युएईत नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे युएईत खेळत असताना दिल्लीच्या संघासमोर आपल्या बॉलिंगकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आयपीएल २०२० मध्ये बॉलिंग डिपार्टमेंटनेच दिल्लीला सावरलं होतं. नॉर्ट्जे आणि कगिसो रबाडा ही दक्षिण आफ्रिकेची जोडी दिल्लीची तारणहार बनली होती. याव्यतिरीक्त आश्विन आणि अक्षर पटेल यांचाही चांगला पाठींबा दिल्लीला मिळाला. त्यामुळे आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामात खेळताना दिल्लीला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग डिपार्टमेंटकडे लक्ष द्यावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

१७ ऑक्टोबरला IPL च्या दोन संघांचा लिलाव रंगण्याचे संकेत

ADVERTISEMENT

२) चेन्नई सुपरकिंग्ज – ७ सामने, ५ विजय, २ पराभव, १० गुणांसह दुसरं स्थान

आयपीएल २०२० च्या तुलनेत यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी ही खरीच उल्लेखनीय झाली आहे. गेल्या हंगामात चेन्नईचा संघ प्ले-ऑफची फेरीही गाठू शकला नव्हता. परंतू यंदाच्या आयपीएलचा उर्वरित हंगाम पुन्हा एकदा युएईत खेळवला जाणार असल्यामुळे चेन्नईसाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते. गेल्या हंगामात खेळाडूंच्या दुखापती, सरावाची कमतरता अशा अनेक समस्यांनी चेन्नईला ग्रासलं होतं. यातूनच धडा घेत चेन्नईचा संघ यंदा युएईत लवकर दाखल झाला आणि त्याने सरावाला सुरुवात केली होती. त्यामुळे उर्वरित हंगामासाठी एन्गिडी, हेजलवूड, शार्दुल ठाकूर या बॉलर्सची फॉर्मात येणं आणि सुरेश रैनाची फलंदाजी यावर चेन्नईची कामगिरी अवलंबून असेल. हे खेळाडू फॉर्मात आले तर यंदा चेन्नईचं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत मानलं जाईल.

३) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – ७ सामने, ५ विजय, २ पराभव, १० गुणांसह तिसरं स्थान

हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडीक्कल यांच्या बहारदार कामगिरीमुळे RCB ने यंदाच्या हंगामात सुरुवातच चांगली केली. तसेच विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स या दोन प्रमुख फलंदाजांचं फॉर्मात असणंही RCB ला फायदेशीर ठरलं. परंतू उर्वरित हंगाम युएईत शिफ्ट झाल्यानंतर RCB साठी युजवेंद्र चहल आणि ख्रिस मॉरिस हे दोन खेळाडू महत्वाचे ठरु शकतात. या दोघांकडे गेल्या हंगामात चांगला खेळ करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंना आपली चमक दाखवावी लागणार आहे. त्यातच दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरचं संघात नसणं RCB ला धोकादायक ठरु शकतं. हर्षल पटेल समजा युएईमधील खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करु शकला नाही तर त्याला पर्याय कोण असेल यावर RCB ची युएईमध्ये उर्वरित हंगामातली कामगिरी ठरेल.

आनंदाची बातमी ! IPL 2021 च्या उर्वरित हंगामात प्रेक्षकांना मर्यादीत स्वरुपात परवानगी

४) मुंबई इंडियन्स – ७ सामने, ४ विजय, ३ पराभव, ८ गुणांसह चौथं स्थान

गेल्या हंगामात मुंबईने युएईत विजेतेपद पटकावलं त्यावेळी त्यांची रणनिती ही पक्की होती. बॅटिंगदरम्यान मुंबईचे बॅट्समन समोरच्या बॉलवरवर अक्षरशः तुटून पडायचे. कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या यांनी गेल्या हंगामात कमालीची फलंदाजी केली होती. त्यामुळे यंदाही युएईत मुंबई इंडियन्सची मदार त्यांच्या बॉलर्सवर असेल. इशान किशन आणि हार्दिक पांड्याला आपला जूना फॉर्म गवसणं गरजेचं आहे. याचसोबत पहिल्या हंगामात हार्दिक पांड्या गोलंदाजी करु शकला नव्हता त्यामुळे दुसऱ्या हंगामात तो गोलंदाजी करणार आहे की नाही यावरुन अनेक गोष्टी अंतिम होतील. जर हार्दिक पांड्या उर्वरित सामन्यांमध्ये बॉलिंग करु शकला तर संघासाठी ते चांगलंच असणार आहे.

IPL 2021 : नवीन हंगामाला उरले अवघे काही दिवस, जाणून घ्या काय आहेत प्रत्येक संघासमोरची आव्हानं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT