जेव्हा सुशील कुमारच्या हट्टामुळे महाराष्ट्राच्या नरसिंग यादवचं ऑलिम्पिक स्वप्न भंगलं होतं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडीयममध्ये दोन पैलवानांच्या गटात झालेल्या मारहाणीत २३ वर्षीय पैलवान सागर राणाचा मृत्यू झाला. सागर राणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपांवरुन ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास ३ आठवडे सुशील कुमार फरार होता, अखेरीस २३ तारखेला दिल्लीत त्याला अटक करण्यात आली.

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अखेरीस अटकेत

जागतिक पातळीवर पदक मिळणारा खेळाडूला खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे क्रीडा क्षेत्राला चांगलाच धक्का बसला. परंतू सुशील कुमार आणि वाद हे प्रकरण नवीन नाहीये. २०१६ साली सुशील कुमारच्या एका हट्टामुळे महाराष्ट्राच्या नरसिंग यादवचं ऑलिम्पिकवारीचं स्वप्न हुकलं होतं. आज या निमीत्ताने २०१६ साली गाजलेल्या नरसिंग यादव विरुद्ध सुशील कुमार प्रकरणाचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Sushil Kumar Arrested : ऑलिम्पिक पदक विजेता ते हत्येचा आरोपी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं?

२०१५ साली जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ७४ किलो वजनीगटाने भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला होता. महाराष्ट्राच्या नरसिंग यादवने या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करुन ऑलिम्पिकसाठी आपलं नाव निश्चीत केलं. पण या विजयानंतरच खऱ्या वादाला सुरुवात झाली. सुशील कुमारने त्यानंतर ७४ किलो वजनी गटात फ्री-स्टाईल प्रकारात आपला दावा ठोकला आणि नरसिंगला आव्हान दिलं.

ADVERTISEMENT

भारतीय कुस्तीत सुशील कुमार हे नाव तोपर्यंत चांगलंच मोठं झालं होतं. दोन ऑलिम्पिक पदकं, राष्ट्रकुल पदकं, आशियाई खेळांमधल पदक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतलं पदक असा भक्कम अनुभव सुशीलच्या पाठीशी होता. त्यातच कुस्ती महासंघात वरचष्मा असणारे प्रसिद्ध प्रशिक्षक सतपाल महाराज यांचा सुशील कुमार हा जावई…सतपाल महाराज यांनी आजपर्यंत भारतीय कुस्तीला अनेक चांगले खेळाडू दिले. त्यामुळे हा वाद मोठं रुप धारण करणार हे दिसून येत होतं.

ADVERTISEMENT

त्यादरम्यान सुशील कुमार काही कारणास्तव ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. पण सुशीलने ७४ किलो वजनीगटात आपला दावा ठोकल्यामुळे कुस्ती महासंघासमोर पेच निर्माण झाला. त्यातच नरसिंग यादवला मिळालेला ऑलिम्पिक कोटा हा नियमानुसार खेळाडूला नाही तर देशाला मिळतो. त्यामुळे कुस्तीमहासंघाने सुशील कुमार आणि नरसिंग यादवमध्ये सामना खेळवण्याचा तोडगा सुचवला. परंतू कालांतराने कुस्ती महासंघाने ट्रायल मॅच खेळवण्याचा निर्णय रद्द केला.

कुस्ती महासंघाने आपला निर्णय रद्द केल्यानंतर सुशील कुमारने याविरोधात कोर्टात धाव घेतली. परंतू इकडेही सुशील कुमारच्या विरोधात निर्णय लागला. नियमानुसार कोर्टाने ऑलिम्पिकला जाण्यासाठी नरसिंग हा योग्य उमेदवार असल्याचं सांगितलं. यानंतर रिओ ऑलिम्पिकला १० दिवस बाकी असताना एक महत्वाची घटना घडली ज्यामुळे नरसिंग यादवचं स्वप्नच चक्काचूर झालं. NADA ने केलेल्या डोप टेस्टमध्ये नरसिंग यादवचा अहवाल पॉजिटीव्ह आला आणि नरसिंगच्या ऑलिम्पिकवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

या प्रकरणानंतर देशात चांगलाच गदारोळ माजला, NADA ने कालांतराने नरसिंग यादवला क्लिन चिट दिली. परंतू WADA (World Anti Doping Agency) ने नरसिंगला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश नाकारत त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घातली आणि नरसिंगचं स्वप्न भंगलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना नरसिंगने सुशीलने आपल्या खाण्यात काहीतरी मिसळल्याचा आरोप केला होता. यानंतर २०१७ सालीही सुशील पुन्हा एकदा अशाच पद्धतीने वादात अडकला होता. गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत सुशील कुमारवर पैलवान प्रवीण राणाला मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT