Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनो ‘टेबल’वर, राऊतांच्या ‘त्या’ फोटोने राजकारण पेटलं

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका कसीनोचा फोटो ट्विट केला होता. या फोटोतील व्यक्तीचे नाव गुपीत ठेवत राऊतांनी खळबळ उडवून दिली होती. यातचं भाजप फसली आणि नेत्याचे नाव सांगून बसली. या फोटोवरूनच आता सोशल मीडियावर भाजप शिवसेनेते युद्ध पेटलं आहे.

Read More

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून दोन अधिकारी शुक्रवारी मध्यरात्री 10 च्या सुमारास एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कलम 447 आणि कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

Nanded : आधी ठाण्यात, आता नांदेडला ‘मिंधे सरकार’…,नांदेड मृत्यू प्रकरणात ठाकरेंचा संताप

नांदेडच्या शासकीय रूग्णालयात गेल्या 24 तासात 24 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे, यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे.डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात हा प्रकार घडला आहे.

Read More

ठाकरेंनी वाघ नखाचा मुद्दा तापवला, शरद पवारांनी विरोधाची धारच काढली, म्हणाले…

राज्यात ठाकरेंनी हा मुद्दा तापवून सत्ताधाऱ्यांना घेऱण्याचा प्रयत्न केला असताना शरद पवारांनी मात्र यावर मवाळ भूमिका घेतली आहे.यावर शरद पवार म्हणाले, राज्य सरकार ही वाघनखं तीन वर्षासाठी आणणार आहे. मला त्यामधलं काही ज्ञान नाही.

Read More

Aditya Thackeray : जपान दौऱ्यांवरून फडणवीसांना लक्ष्य, ‘आदू बाळा’… म्हणत शेलारांची बोचरी टीका

भाजपकडून आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर ‘आदू बाळा’ असा आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत बोचरी टीका केली आहे.

Read More

Maratha Morcha: ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये लाज उरली…’,आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका

राज्यपालांसोबतच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी हा लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच पोलीस कधीही विचारल्याशिवाय लाठीचार्ज करत नाही.

Read More

‘दिशा सालियान प्रकरणाची…’, शिंदे गटात प्रवेश करताच राहुल कनाल काय म्हणाला?

राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर नेहमीच गंभीर आरोप होतो. आता आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीच हे प्रकरण पुन्हा उकरून काढल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read More

BMCत चार घोटाळे अन् 4 आरोप, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याचसोबत 4 घोटाळ्यांची माहिती दिली आहे.

Read More

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री, ठाकरे-पवार डीलमुळे शिवसेना फुटली ?

सुप्रिया सुळे (supriya sule) यांना मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्लान आखला गेला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात या संदर्भातील ड़ील देखील झाली होती. या डीलमुळेच शिवसेना फुटल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Read More

आदित्य ठाकरेंनी वाचली यादी, राज्यव्यापी मेळाव्यात एकनाथ शिंदेंना घेरलं

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) यांचा घटनाबाह्य सरकार असा उल्लेख करत, आज जसे मी प्रेझेंटेशन दिलेय,तसे त्यांनी वर्षभरातील मुंबईतील कामांचे प्रेझेटेशन द्यावे, असे थेट आव्हान; दिले आहे. या आव्हानाला मुख्यमंत्री शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More