Ramesh Bais : झारखंडमध्ये सरकारशी संघर्ष; महाराष्ट्रात काय होणार?

Ramesh Bais Maharashtra’s New Governor : मुंबई : वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून अखेर मुक्त करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेला राजीनामा आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर […]

Read More

राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार! PM मोदींकडे स्वतःच केली मोठी मागणी

मुंबई : वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदावरुन जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यांनी स्वतः राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. राजभवनातून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मनन करण्यात घालविण्याचा मानस असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी […]

Read More

उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, राज्यपालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उदयनराजे आज दिल्लीत पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी करणार आहेत. उदयनराजेंच्या तक्रारीची राष्ट्रपतींकडून दखल राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अवमानकारकविधाने केल्यानंतर छत्रपतींचे वशंज निर्णय घेतला. […]

Read More

छत्रपती उदयनराजेंनी दिलेला अल्टिमेटम संपला : राज्यपालांविरोधात मोठा निर्णय जाहीर करणार?

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी या हटविण्यासाठी आक्रमक झालेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अल्टिमेटम आज संपत आहे. मात्र अद्याप या दोघांवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं सांगत उद्या (सोमवारी) दुपारी ते त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यासाठी उद्या दुपारी उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात ते […]

Read More

PM मोदींना माझी हात जोडून विनंती, कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती

परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. यावरुनच आता संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा असं म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय म्हटलं? औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब […]

Read More

राज्यपालांनी घेतली CM शिंदेंच्या पत्राची दखल : ‘मविआ’ची 12 आमदारांची यादी अखेर रद्द

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या पत्राची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. यानुसार अखेर महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे. राजभवनातून शनिवारी संध्याकाळी ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविण्यात आली आहे. काल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली 12 आमदारांची शिफारस मागे घेण्यासंदर्भात […]

Read More

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोण कोणत्या वादांमुळे चर्चेत राहिले?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता माफी मागितली आहे. शनिवारी त्यांचं एक वक्तव्य व्हायरल झालं होतं, ज्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर त्यांनी ट्विट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगितलं. अखेर या प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे. मात्र वाद […]

Read More

‘राज्यपालाला जोड्यानं मारलं पाहिजे!’; शिवसेना आमदार राजन साळवींनी भगतसिंह कोश्यारींना दिला इशारा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याच्याविरोधात विविध स्तरावरून पडसाद उमटत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षातील नेत्यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचाविरोधात भूमिका मांडली आहे. आता कोकणातील शिवसेनेकडून देखील निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी देखील राजापूरमध्ये तीव्र शब्दात कोश्यारी यांचा निषेध केला आहे. राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. […]

Read More

आशिष शेलारांकडून कोश्यारींच्या वक्तव्यावर भाजपची भूमिका स्पष्ट; सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर तोफही डागली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. अशात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांची देखील राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसलेली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी भाजपा अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि […]

Read More

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती तुर्तास थांबवा; शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका

नवी दिल्ली: महाविकास आघाडी सरकारनं १२ आमदारांची यादी राज्यपालांकडं पाठवली होती. पण, राज्यपालांनी ना हिरवा कंदील दिला ना कुठलं भाष्य केलं. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं, शिंदे फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीच्या १२ आमदारांची यादी रद्द करण्याची मागणी शिंदे सरकारनं केली. त्यानंतर राज्यपालांनी लगेच ही यादी रद्द केली. आता शिंदे-फडणवीस सरकारनं विधान परिषदेच्या रिक्त जागांवर आपले […]

Read More