मातोश्रीचे दरवाजे ‘त्यांनीच’ बंद केले, संजय राऊत यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची घेतलेली भेट तीन दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबत आज संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की फडणवीस आधी सिल्वर ओकवर गेले, त्यानंतर खडसेंच्या घरी गेले आता ते मातोश्रीवरही येतील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आता संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे. मातोश्रीचे दरवाजे त्यांनीच आमच्यासाठी बंद […]

Read More

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं मातोश्रीचं निमंत्रण स्वीकारलं असं आशिष शेलार का म्हणाले?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेलं मातोश्रीचं निमंत्रण स्वीकारलं असं आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते एकनाथ खडसेंच्या घरी गेले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या दोन भेटींवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या. याबाबत संजय […]

Read More

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

एकीकडे देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना इंधर दरवाढीमुळे सामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. याविरोधात मुंबईत काँग्रेसने आज आंदोलन केलं. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार अस्लम शेख या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाबा रामदेव, अभिनेता अक्षय कुमार, अनुपम खेर यांचे मुखवटे घालून जुन्या काळात पेट्रोल दरवाढीबद्दल त्यांच्या […]

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय? आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जातो आहे. याचं कारण आहे ते म्हणजे गेल्या तीन दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर होते त्यावेळी ते एकनाथ खडसेंच्या घरी […]

Read More

माझ्यामुळे सत्ता गेल्याचं फडणवीसांना दुःख – संजय राऊतांचा निशाणा

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला कलगीतुरा काही संपण्याचं नाव घेत नाहीये. संजय राऊतांवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनीही बोचऱ्या शब्दांमध्ये पलटवार केला आहे. “फडणवीसांना माझ्यावर टीका करु द्या, पुढची तीन-साडे तीन वर्ष […]

Read More

देवेंद्र फडणवीसांकडून सलग दोन दिवसात दोन गुगली, नव्या राजकारणाची सुरुवात

जळगाव: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सलग दुसऱ्या दिवशी भलभल्या राजकीय तज्ज्ञांनाही बुचकळ्यात पाडलं आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी खेळीच तशी केली आहे की, ज्यामुळे राजकीय पंडितही चकीत झाले आहेत. ते देखील सलग दुसऱ्या दिवशी. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी सलग दोन दिवस महाराष्ट्रातील अशा नेत्यांच्या भेटीला गेले की, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आता उलटसुलट […]

Read More

पवार-फडणवीस भेटीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (31 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (sharad Pawar) यांची थेट त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या याच भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अशावेळी आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याच भेटीबाबत एक महत्त्वाचं […]

Read More

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मंत्र दिला का? संजय राऊत यांनी दिलं उत्तर

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत सोमवारी झाली. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट नेमकी का झाली असावी? या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात का? अशीही चर्चाही सुरु झाली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी राजकीय परंपरा राहिली आहे की, वैर हे राजकीय असावं वैयक्तिक नसावं. याच हेतूने देवेंद्र […]

Read More

कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी आमदार महेश लांडगेंवर गुन्हा दाखल

मुलीच्या हळद आणि संगीत कार्यक्रमात गर्दी जमवून कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात आमदार महेश लांडगे आणि इतर ५० जणांच्या जमावावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. मुलीच्या हळद आणि संगीत कार्यक्रमात आमदार लांगडे यांनी मांडळ डहाळे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या […]

Read More

या ‘भेटी’मागे दडलंय काय…? शरद पवार-फडणवीस भेटीमागचे साडेतीन अर्थ!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ इथे भेट झाली. पण भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात का? अशीही चर्चाही सुरु झाली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी राजकीय परंपरा राहिली आहे की, वैर हे राजकीय असावं […]

Read More