अमित शाह-शरद पवार भेटीबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात भेट झाली की नाही हे मला ठाऊक नाही. मात्र देशाच्या गृहमंत्र्याना जर शरद पवार भेटले असतील तर त्यात गैर काय? त्यांना कुणीही भेटू शकतं. कोणत्याही कामासाठी अमित शाह यांना कुणीही भेटू शकतं. उद्या आम्हाला वाटलं तर आम्हीही त्यांना भेटू शकतो त्यात चुकीचं काय? असा प्रश्न संजय राऊत […]

Read More

पिंपरीत भाजप नगरसेविकाच्या मुलाचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू

पिंपरीत भाजप नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून घेतली. भाजप नगरसेविका करूणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्न शेखर चिंचवडे याने डोक्यात गोळी झाडून घेतली. प्रसन्न २१ वर्षांचा होता. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. चिंचवडमध्ये राहत्या घरात त्याने वडिलांच्या लायसन्स पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडून घेतली. त्यानंतर प्रसन्नला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान […]

Read More

पवारांच्या भेटीवर अमित शाहंचं सूचक विधान, म्हणाले…

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप, सचिन वाझेंना झालेली अटक या विषयांवरुन अडचणीत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी एक मुद्दा आता प्रामुख्याने चर्चेला आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी अहमदाबादमध्ये प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेतली. पवार आणि पटेल यांचा हा […]

Read More

शरद पवार, प्रफुल पटेल अहमदाबादमध्ये कोणाला भेटले?

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये शुक्रवारी रात्री शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली अशी माहिती समोर येत आहे. यात स्थानिक माध्यमांनी पवार हे अमित शाहांना भेटल्याचे वृत्तही दिले आहे. प्रफुल पटेल यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. असं असलं तरी शरद पवार आणि प्रफुल पटेल हे शुक्रवारी रात्री अहमदाबादमध्ये होते हे नक्की. […]

Read More

सचिन वाझेंचे मालक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बसले आहेत-फडणवीस

महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली आहे तेवढी दुसऱ्या कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. नवाब मलिक हे का चिंतेत आहेत ते मला व्यवस्थित माहित आहे कारण त्यामुळे सत्तेत असणाऱ्या अनेकांचं बिंग फुटतंय. मी केंद्रीय गृह सचिवांना जे पत्र दिलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना चिंता वाटू लागली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे. ज्या रिपोर्टमुळे महाराष्ट्र […]

Read More

प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा, नेमकं काय म्हणाल्या काँग्रेस आमदार?

सोलापूर: ‘अधिकारी जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात तेव्हा तो कोणाच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. असे जर आरोप होत असतील तर शंभर टक्के कोणाचा तरी पाठिंबा आहे.’ असं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने […]

Read More

वारसा! विचारांचा बरं का फक्त रक्ताचा नाही…

‘राजनीती’ हा शब्द “राज” आणि “नीती” या दोन शब्दांनी तयार झाला असला तरी राजनीती’ हा शब्द असा एकत्र करून उच्चारला तरी प्रतिसाद 99.99 टक्के हा नकारात्मक आणि निरूत्साही असतोच. I don’t know politics, I don’t follow …. असं म्हणून किमान नम्रतेने बोलणारे कमी का होईना आढळतातच..’राज’ (जवाबदारी) ‘नीती’ ने करण्यासाठी असते आणि म्हणून शब्द राजनीती […]

Read More

अजित पवार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल काय म्हणाले?

मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण तसंच आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीय. अशातच विरोधी पक्ष भाजपकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जातेय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आणि या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. मोदी सरकारमधल्या […]

Read More

शिवसेनेऐवजी कसे अडकत गेले अनिल देशमुख?

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित कारने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. अंबानी कुटुंबीयांशीसंबंधी ही घटना असल्याने हे प्रकरण खूपच हाय-प्रोफाइल झालं. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेपासून सुरु झालेल्या या प्रकरणातून अनेक नवनव्या गोष्टी घडत गेल्या आणि त्याचे हादरे आता थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना बसत आहेत. आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे […]

Read More

सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हा पार पडलं तेव्हा त्या अधिवेशनात एपीआय सचिन वाझे यांच्यावर बरेच आरोप झाले. अँटेलिया केस, मनसुख हिरेन या सगळ्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ या अधिवेशनात पाहण्यास मिळाला. मात्र सभागृहात एवढं सगळं प्रकरण तापलेलं असताना मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे का आले नाहीत हा प्रश्न सभागृहातही उपस्थित करण्यात आला. मात्र अधिवेशन […]

Read More