Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही हात जोडून विनंती: मुख्यमंत्री

मुंबई: ‘राज्याच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला. काय तर म्हणे, महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सुप्रीम कोर्टाने (Supreme […]

Read More

Maratha Reservation Verdict: तेव्हाच माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती: देवेंद्र फडणवीस

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द (Strikes Down Maratha Reservation) केल्यानंतर आता याबाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. अनेक नेत्यांनी या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, ‘जेव्हा कोर्टाने या कायद्याला स्थगिती दिली तेव्हाच माझ्या मनात […]

Read More

पंढरपूर पोटनिवडणूक पुन्हा घ्या, राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे मागणी

पंढरपूर: राज्यात सत्ता असताना देखील पंढरपूर पोटनिवडणुकीत (pandharpur by-election) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. पण आता हीच पोटनिवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलचे अॅड. नितीन माने यांनी निवडणूक आयोगाला त्यासंबंधी पत्र […]

Read More

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके का हरले आणि भाजपचे समाधान आवताडे का जिंकले वाचा कारणं

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा येथे पोटनिवडणूक झाली, या पोट निवडणुकीत भारत भालकेंचा मुलगा भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजेच महाविकास आघाडीने तिकिट दिलं. तर भाजपने समाधान आवताडे यांना तिकिट दिलं. ही निवडणूक भाजपने अत्यंत चुरशीची केली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील वा भाजपचे […]

Read More

रडीचा डाव ! ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर शरद पवारांनी संतप्त प्रतिक्रीया

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने भाजपची झुंज मोडून काढत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात रंगतदार लढाई सुरु होती. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये पिछाडीवर पडलेल्या ममता बॅनर्जींनी नंतर चांगलं पुनरागमन करत विजय मिळवला. परंतू यानंतर निवडणूक आयोगाने सुवेंदू अधिकारी […]

Read More

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या जारकीहोळींचा पराभव

कर्नाटकातील बेळगाव लोकसभेच्या पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी बाजी मारली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लावण्यात आली होती. काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी रिंगणात होते तर महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली होती. अखेरपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या मंगला अंगडी यांनी बाजी मारली आहे. Pandharpur By-election Result: पंढरपुरात भाजपकडून […]

Read More

बंगालमध्ये भाजपचा पराभव, पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्या शब्दात केला भाजपवर हल्लाबोल

मुंबई: पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आज (2 मे) जाहीर झाले आहेत. यावेळी सगळ्यांचं लक्ष हे प. बंगालच्या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. कारण प. बंगालमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने प्रचंड ताकद पणाला लावली होती. मात्र, या सगळ्याला एकट्या ममता बॅनर्जी यांनी सक्षमपणे तोंड देत एकहाती प्रचंड विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयाचं आता देशभरातून कौतुक होत आहे. […]

Read More

Pandharpur By-election Result: पंढरपुरात भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’, समाधान आवताडेंचा निर्णायक विजय

नितीन शिंदे पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत अटीतटीची ठरली आहे. पण या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी अखेरच्या क्षणी विजय मिळवला आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा जवळजवळ 3733 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. मागील काही दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीकडे अवघ्या […]

Read More

तृणमूल मधला कचरा घेऊन भाजप विजयाची स्वप्न पाहत होतं – प्रशांत किशोर

सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या विधानसभेत मुसंडी मारत हॅटट्रीकच्या दिशेने आगेकूच केलेल्या तृणमूल काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठी फौज उतरवली होती. परंतू पश्चिम बंगालमधील जनेतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे. बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयात मोलाची भूमिका निभावणाऱ्या राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बंगालमधील […]

Read More

West Bengal Election Counting : भाजपच्या गद्दारीला लोकांनी चपराक दिली आहे – शिवसेना

भाजपचं कडवं आव्हान मोडून काढत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांची फौज उतरवली होती. परंतू सुरुवातीला हाती येत असलेल्या कलांचा आढावा घेतला असता पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममतांच्या पारड्यात आपलं मत टाकल्याचं दिसतंय. भाजपचा […]

Read More