बाळासाहेबांच्या आत्म्याला समाधान नसेल, उद्धव साहेबांनी आत्मपरीक्षण करावं : कदमांचा सल्ला

शिवसेनेचेच दोन मेळावे, दोन्ही ठिकाणी भगवे झेंडे, दोन्ही ठिकाणी बाळासाहेबांचे फोटो, हे 57 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत आहे. खरतंर हे घडायला नको होतं अशी खंत शिंदे गटाचे नेते रामदास कदम व्यक्त केली. ते खेडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आत्मपरिक्षणही करण्याचा सल्ला दिला. तर आज पक्ष वाचला असता : रामदास कदम […]

Read More

उद्धव ठाकरे यांनी संत सेवालाल महाराजांचा प्रसाद नाकारला? : भाजपनं निशाणा साधत केला निषेध

मुंबई : बंजारा समाजाचे महत्त्वाचे तीर्थस्थान असलेल्या पोहरादेवी गड येथील महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुनील महाराज व बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दरम्यान सुनील महाराज यांच्या प्रवेशानंतर भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून त्यांचा निषेध […]

Read More

शंभुराज देसाईंनी केली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची तुलना, ठाकरेंना काढले चिमटे

शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी ठाकरे-शिंदे अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची तुलना करत उद्धव ठाकरेंना चिमटे काढले आहेत. शंभुराज देसाईंनी केली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची तुलना मागच्या काळात वेळ मागून भेट मिळत नसल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये जागेवर निर्णय घेण्याची क्षमता आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन […]

Read More

Ramdev Baba: ”बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार एकनाथ शिंदेच”

ठाणे: रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यानंतर त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. एका माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये रामदेब बाबा म्हणाले ”एकनाथ शिंदे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत.” काल रामदेव बाबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची […]

Read More

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी केलेलं शेवटचं भाषण जसंच्या तसं..

महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड पुकारलं होतं तेव्हाच मोठी उलथापालथ झाली होती. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला यात काही शंकाच नाही. या भूकंपाचं केंद्र सुरूवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीमध्ये गेलं. आठ दिवस आरोप-प्रत्यारोप, डाव प्रतिडाव चालले ते शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदार यांच्यात. भाजप या सगळ्यात कुठेही नव्हते. मंगळवारी देवेंद्र फडणवीस दिल्लीला […]

Read More

Sanjay Raut : बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला

बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, हे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जे भाष्य केलं त्यात त्यांनी मला आपल्याच लोकांनी दगा दिला हे म्हटलंय. त्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो दगा हा शब्द वापरला त्याचा […]

Read More

Uddhav Thackeray: माझ्या माणसांनीच मला दगा दिला,काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस कॅबिनेट बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले तसंच माझ्याच लोकांनी मला दगा दिला असं यावेळी उद्धव ठाकरे […]

Read More

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे ‘बंड’ सर्वोच्च न्यायालयात! आज सुनावणी

एकनाथ शिंदेंसह जवळपास ३८ ते ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्या जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेनं १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केलीये. यावरूनच आता हे बंड सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होणार […]

Read More

बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीस दाखल; तात्काळ लेखी उत्तर देण्याचे आदेश

विधानसभेच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. यात चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील बंडखोर पाच आमदारांपैकी चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे यांनाही यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आले आहे. […]

Read More

आमदारांचे निलंबन अन् गटनेतेपदावरुन वाद, एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात जाणार?

मुंबई: शिवसेनेने बंडखोर आमदारांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले असतानाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. गटनेते पदावरुन हटवने आणि झिरवाळ यांच्या निलंबनाच्या नोटीवरुन शिंदे गट सुप्रिम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे मुंबई आणि दिल्लीतील वरिष्ठ वकिलांच्या सतत संपर्कात आहेत. शिंदे हे प्रत्यक्षात उपसभापतींच्या नोटीसला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. […]

Read More